• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तलाठी ठाकरेंच्या घरावरील गोळीबार प्रकरणात ट्विस्ट; पोलीस तपासांत सर्वांनाच बसला मोठा धक्का

August 11, 2026 by admin Leave a Comment


अमरावती शहरात रविवारीमध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एका निलंबित तलाठ्याच्या घरावर गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. अमरावतीच्या अर्जुन नगरमध्ये ही घटना घडली. बुरखा घालून आलेल्या आरोपींनी निलंबित तलाठ्याच्या घरावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणाने प्रशासनात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे .

काय आहे नेमकी घटना?

अमरावतीच्या अर्जुननगरमध्ये आरोपी दुचाकीवरून आले. या हल्लेखोरांनी निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार केला. पोलीस तपास ठाकरेंच्या घराच्या भितींला गोळ्या लागल्याचे दिसून आले. गोळीबाराच्या घटनेवेळी ठाकरे कुटुंब घरात होते. बुरखा घालून आलेले आरोपी गोळीबारानंतर फरार झाले. गोळीबारानंतर गाडगेनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला होता. त्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांनी स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणल्याचे समोर आलं आहे. गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासाच्या आत या थरारक घटनेचा पर्दाफाश केला आहे. विपुल ठाकरे यांनी स्वतःच्या घराच्या दिशेने फायर करण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली आहे. दुसऱ्या एका गुन्हात फरार असलेला विपुल ठाकरे यांचा धक्कादायक कारनामा उघड ढाला आहे. न्यायालयात आपली बाजू मजबूत करण्यासाठी विपुल ठाकरे यांनी हा बनव रचला असावा, अशी पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे. दोन आरोपी बुरखा घालून दुचाकीवरून आले होते. त्यांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

विपुल ठाकरे फरार

एका प्रकरणात विपुल ठाकरे यांची फरार म्हणून नोंद आहे. ठाकरेंच्या विरोधात अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर पैसे उकळल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याच प्रकरणात विपुल ठाकरे यांचं निलंबित करण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in