• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

…तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल; संजय राऊतांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

July 26, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मोदी सरकार झुकलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यामुळे सरकार बॅकफुटवर गेल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या चर्चेदरम्यान विरोधकांनीही एकत्र आलं पाहिजे. सर्वजण एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘ जंतरमंतरवर सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. लाल बावटा असेल. निळा बावटा असेल. इतर काही बावटे. सगळे एकत्र आले. विरोधी पक्षानेही आपले सगळे बावटे दूर ठेवून एकत्र येतील. मनाने एकत्र येतील, त्यादिवशी नरेंद्र मोदींचे लोक एक दिवस देखील सत्तेवर राहणार नाहीत. एका कारणासाठी भव्य आंदोलन झालं. जगाने दखल घेतली. ईव्हीएम घोटाळा, मत चोरी. आमदार-खासादारांची फोडाफोडी, पक्ष फोडणे, संविधानावर हल्ला या कारणासाठी लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल’.

शिवाजी पार्कवरील अभिनंदन सभेबाबत राऊत म्हणाले, ’20 ते 21 जणांनी आत्महत्या केल्या. अनेकांनी लाठ्या खाल्या. काहींनी पेलेट गनच्या गोळ्या खाल्ल्या. त्यामुळे जास्त मोठं आनंद व्यक्त करता येणार नाही. शिवाजी पार्कवर कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकणार नाही. तिथे दोन जणांचे भाषणे होतील’. आंदोलनातून काय बोध घ्यावा, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ‘सत्ता आहे. बहुमत आहे. म्हणून माज दाखवू नका. हिटलर सारखे वागाल, त्याच मार्गाने जावे लागेल, मुसोलिनी सारखे वागल, तर त्यांचासारखा अंत होईल. . गद्दाफीसारखं वागाल तर त्यांचा अंत होईल. दिल्लीत ठाकरे असताना त्यांनी अरविंद केजरीलवाल यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधी यांच्याशी जवळपास फोनवरून 35 मिनिटे चर्चा केली’, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संजय राऊतांची मागणी

‘आदित्य ठाकरे बोलले आहेत, त्यांची भूमिका योग्य आहे. नीट पेपरफुटीमुळे 21 जणांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे PM मोदींपासून इतरांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. कायद्याचे राज्य असेल तर होईल. या आंदोलनापुढे भाजपच्या आयटी सेलपुढे सेलला झुकायला लावलं, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत बुवा बसलाय. महाराष्ट्रात बुवा बसला आहे. ठाण्यात एक बुवा बसला आहे. बुवाबाजी सुरू आहे. त्यांचा गुरू अशोक खरात, अशी टीका त्यांनी पुढे केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL: पाचव्या दिवशी टीम इंडियाचा विजयाचं स्वप्न भंगणार का? हातातला सामना ड्रॉ होण्याची भीती!
  • सोशल मीडियावर ‘झुठ की गुंज’ संकेतस्थळाची चर्चा, राहुल गांधींचे दावे चुकीचे दावा
  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in