• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

July 22, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठी घोषणा केली आहे.  विद्यार्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे उद्या मौन आंदोलन करणार आहेत.   साकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकामध्ये अण्णा हजारे हे आंदोलन करणार आहेत.  सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद सांधून त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र देखील लिहिलं आहे.

पत्रात अण्णा हजारे यांनी नेमकं काय म्हटलं?  

नवी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना मनाला वेदना देणारी आणि दुःखद आहे. लोकशाही व्यवस्थेत घडणाऱ्या अशा घटना कोणाच्याच हिताच्या नसतात. माझं असं ठाम मत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंसाचार, सार्वजनिक संपत्ती नुकसान तसेच अनावश्यक बळाचा उपयोग होता कामा नये. आज देशातील लाखो तरुण पेपरफुटी प्रकरण, नोकरभरती प्रक्रियेमध्ये होणारा विलंब, बरोजगारी, तसेच इतर अनेक समस्यांमुळे चिंतेनं ग्रासले आहेत. तरुणांमध्ये आज जो काही असंतोष निर्माण झाला आहे, त्याला केवळ कायदा आणि प्रशासन व्यवस्थेचं अपयश म्हणून न पहाता, त्यांच्या समस्या समजून घेणं गरजेचं आहे. 2024 मध्ये देखील नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं होतं, या वर्षी देखील पेपर फुटले आहेत, 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. नीट परीक्षा पुन्हा घेण्यात आली, मात्र या परीक्षेच्या निकालामध्ये देखील घोळ असल्याच्या बातम्या येत आहेत.

सरकारी कार्यप्रणालीमध्ये जेव्हा काही गडबड होते, किंवा घोटाळा होतो, तेव्हा त्यासाठी या यंत्रणेतील छोट्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवलं जातं, मात्र जेव्हा काही चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा त्याची जबाबदारी सरकार घेते. ही पद्धत योग्य नाहीये. गेल्या 25 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्यांच्याकडून या खात्याशी संबंधित मंत्र्‍यांचा राजीनामा मागितला जात आहे, मला वाटतं जर जबाबदारी निश्चित करून त्या मंत्र्यानं राजीनामा दिला तर एका मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे संपूर्ण सरकार कोसळणार नाहीये. तर यातून इतर मंत्र्यांना देखील स्पष्ट संदेश जाईल की जर त्यांनी आपलं काम योग्य पद्धतीने केलं नाही तर त्यांचं देखील पद जाऊ शकतं, असं या पत्रामध्ये अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in