• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका

May 24, 2026 by admin Leave a Comment


संजय गायकवाड यांनी शिवरायांचा इतिहास वाचला असता तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय सजा दिली होती हे कळले असते. या गद्दारांना पळतानाही हजारदा विचार करावा लागला असता अशी टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. सत्ताधाऱ्यांनी डोकं थाऱ्यावर ठेवून देशात आणि राज्यात काय परिस्थिती आहे. रोजगार किती आहेत? सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झाली आहे. या सरकारमुळे शहरांची काय अवस्था झाली ? पाण्याची किती कमतरता आहे, रेस्टॉरंट बंद होत आहेत. छोटे-मोठे उद्योगांचे काय हाल सरकारने केले आहे याचा विचार करावा, अन्यथा लोकच यांना पळवून लावतील अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कुंभमेळ्यासाठी कोणाचाही विरोध नाही. नाशिकला काही फायदा आहे का ? हा एक प्रश्न उपस्थित होतो.जिथे खोदकाम सुरू आहे, तेथे पावसाळा सुरू झाल्यानंतर नाशिककरांना याचा त्रास होईल का ? याचा विचार सरकारने केला पाहिजे. आपली जी रुपयाची परिस्थिती झाली आहे,त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. सरकार आपल्याला आश्वासन देऊ शकते का ही कामे पेमेंट होत नसल्यामुळे थांबणार नाहीत, कॉन्ट्रॅक्टर काम सोडून जाणार नाहीत याची खात्री सरकार घेईल का ? अनेक कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळत नाही त्यांचे काय होणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

नाशिक (रिंगरोड आणि कुंभमेळा प्रकल्प) येथे भूसंपादनासाठी शेतकरी महिलेला घरात घुसून मारहाण झाली होती. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की राऊत साहेबांनी तो विषय घेतला होता, एका महिलेला मारहाण केली घरी जाऊन, अधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. शेतकरी कधीही चांगल्या कामाला विरोध करीत नाहीत. पण शेतकऱ्यांना नीट विचारात घेतले पाहिजे असेही ठाकरे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत तेथून ते दरेगावला जातील अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. विधान परिषदेच्या १७ जागांवर होऊ घातलेल्या निवडणूकांसंदर्भात पक्षाची भूमिका उद्धव साहेब जाहीर करतील.चांगले आहे मी बाहेरच्या पाच देशांचा दौरा तर केला नाही असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.

कॉक्रोच पार्टीची यांना भीती किती

भाजपा सरकार जसे इतर पार्टीच्या मागे लागतात तसे या पार्टीच्या मागे लागले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया पेजला भाजपच्या सरकारला बॅन करावसे वाटले, म्हणजे विचार करा भीती किती वाटत असेल.यांच्या विरोधात कोणी बोललं तर पाकिस्तानसोबत संबंध जोडतात आणि हे पाकिस्तान सोबत सेमी फायनल खेळतात असाही टोमणा आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
  • Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in