• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज

June 23, 2026 by admin Leave a Comment


उद्धव ठाकरे गटाच्या फुटलेल्या सहा खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय पाटील यांनी बऱ्याच गोष्टी उघड केल्या. त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. आज संजय राऊत यांनी नियमित पत्रकार परिषदेत संजय पाटील यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. संजय पाटील म्हणाले की, मी उमेदवारी मागायला गेलो नव्हतो, उद्धव ठाकरेंनी मला उमेदवारी दिली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “त्यांचं कोणाशी भांडणं होतं मला माहित नाही. उद्धव ठाकरेंशी तुमचं भांडणं नव्हतं, तर मग तुम्ही रहायला पाहिजे होतं. ज्यांच्याशी भांडणं होतं, त्यांच्याशी मातोश्रीवर येऊन चर्चा करायला पाहिजे होती. या सगळ्या गोष्टींचा पक्ष सोडण्याशी काहीही संबंध नाही”

“त्यांच्याकडे 13 तारखेला 15 कोटी आले. 14 तारखेला 5 कोटी आले. मग दिल्लीतला व्हीप धुडकावला. ते अदृश्य झाले. मग, उरलेले 35 कोटी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाण्यापूर्वी मिळाले. हा गद्दारीचा हिशोब माझ्याकडे आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला. “यांनी जे व्यवहार केले, ते ईडीच्या रडारवर आले. मग, ते धाराशिवचे खासदार असतील. त्यांचे बँकेचे व्यवहार असतील. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. त्यावर काल पक्षात चर्चा झाली. सांगू कोणाला कुठे, कोणत्या हॉटेलमध्ये ब्लॅकमेल केलं” असा दावा संजय राऊत यांनी केला. ‘

संजय पाटील यांनी तमाशा केला

मनसेला उमेदवारी द्यायची नव्हती म्हणून भांडूपमध्ये माझ्या मुलीला उमेदवारी दिली, असं संजय पाटील म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “मुलीच्या उमेदवारीसाठी संजय पाटील यांनी तमाशा केला. उमेदवारी दिल्यावर सुद्धा ते खोटं बोलत आहेत. मिंधे गटात गेल्यावर खोटं बोलायची जास्त सवय लागते” असं राऊत म्हणाले.

सोड रे एकनाथ शिंदे चलं

संजय पाटील यांनी बंदुकीची Action केली, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाईट नजरेने बघितलं तर हॉस्पिटलमध्ये जालं असं ते म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी त्यांना थेट चॅलेंज दिलं. “मी लागतो नादाल चल, तुझ्या नादाला लागतो मी. बंदुक दाखवू नको, नाव घेऊन बोलतो XXXX. शिवसैनिकांना बंदुक दाखवू नकोस. मी इथेच आहे. बंदूक दाखवतोस साल्या. मी भांडूपलाच आहे, शिवसैनिकांना बंदुक दाखवतो गद्दार माणूस. 50 कोटी गिळलेना मग गप्प बसं. परत बंदुकीची भाषा करायची नाही. बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन. झेड प्लस सुरक्षा काढून ये. कायदा-सुव्यवस्था आहे की नाही मिस्टर फडणवीस. सोड रे एकनाथ शिंदे चलं” अशा भाषेत संजय राऊत बोलले.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Haiwaan Trailer : अक्षय कुमारच्या क्रौर्यासमोर सैफ अली खानची जीव वाचवण्यासाठी धडपड; ‘हैवान’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in