• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…

June 23, 2026 by admin Leave a Comment


उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. 28 जून ही तारीख ठरली असल्याचंही सांगितलं जात आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये स्वतः दौरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशीम आणि शिर्डी या सहा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यावेळी 28 जून रोजी उद्धव ठाकरे उपस्थित राहून पुन्हा एकदा गटाची पुनर्बांधणी करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी तसेच बैठकांसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. स्थानिक नेते बैठका घेत असून बॅनरबाजी, मंडपं इत्यादी गोष्टींची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आधीच, पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबाबत जास्त विचार न करता संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in