• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तमन्नाला ‘मिल्की बॉडी’ म्हटल्याने ट्रोल, अन्नू कपूर म्हणाले “70 वर्षांचा म्हातारा..”

April 24, 2026 by admin Leave a Comment


अन्नू कपूर हे टेलिव्हिजन आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत. छोट्यातल्या छोट्या भूमिकेतूनही ते विशेष छाप सोडतात. दमदार अभिनयकौशल्यासोबतच ते त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी अभिनेत्री तमन्ना भाटियावर ‘दुधाळ फिगर’ (मिल्कीटोन फिगर) असल्याची कमेंट केली होती. तिच्या ‘आज की रात’ या आयटम साँगवर प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं होतं. यावरून सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. 70 वर्षीय अभिनेत्याला अशी कमेंट करणं शोभतं का, असा सवाल ट्रोलर्सनी केला होता. या वादावर आता अन्नू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत ते म्हणाले, “माझ्या त्या वक्तव्यावरून लोकांनी मला शिव्या दिल्या, म्हाताऱ्याचं डोकं फिरलंय, असं म्हणाले. मी फक्त दुधाळ फिगर म्हटल्याने एवढा मोठा वाद झाला. हेच जर मी इंग्लिशमध्ये ‘मिल्की बॉडी’ म्हटलं असतं तर काहीच समस्या नसती. लोकांनी हिंदीत काही म्हटलं तर समस्या निर्माण होते. आपलीच भाषा लोकांना जास्त टोचते, पण तेच इंग्रजीत म्हटलं तर काही वाटत नाही. तमन्नाचं वय काय असेल, 28 किंवा 30? ती माझ्या मुलीच्या वयाची आहे.”

प्रशंसा आणि चुकीचा उद्देश यांमधील फरक सांगताना ते पुढे म्हणाले, “मी कोणत्याही शरीराचं निरीक्षण केलं तरी त्या फिजिकचं कौतुक करणार. पण त्यामागी माझी लालसेची भावना नसते. त्या व्यक्तीसाठी माझ्या मनात ‘लस्ट’ (कामुक भावना) नसते. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी तुमच्या रॉल्स रॉयस गाडीचं कौतुक करू शकतो, पण त्याचा मोह करणं गरजेचं नाही. जर मला तमन्नाने विचारलं की, तुम्ही असं म्हणालात का? तर मी म्हणेन, होय.. जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी पाया पडायलाही तयार आहे. जर 70 वर्षीय म्हातारा तिच्या पाया पडायला तयार असेल, तर ती काय म्हणणार? काहीच नाही. कारण माझा हेतू चुकीचा नव्हता.”

अन्नू कपूर यांनी शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांना तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ या गाण्याची एक क्लिप दाखवण्यात आली होती. ही क्लिप पाहून त्यांनी तमन्नाचं कौतुक केलं होतं. परंतु हे कौतुक त्यांनी ज्या शब्दांत केलं, ते ऐकून नेटकरी भडकले होते. मुलाखतकर्त्याने अन्नू कपूर यांना विचारलं होतं की त्यांना तमन्नाचं ‘आज की रात’ हे गाणं आवडलं का? त्यावर त्यांनी लगेच उत्साहात उत्तर दिलं होतं की, “माशाअल्लाह, काय मिल्की फिगर आहे!” याच टिप्पणीवरून मोठा वाद झाला होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतापुढे सर्वात मोठं संकट, एका निर्णयामुळे हजारो कोटी बुडणार… 60 टक्के व्यापार संकटात?
  • Video: ‘अरे क्यूट बॉय, जरा इकडं बघ की’ वैभव सूर्यवंशीवर कोण इतकं फिदा? त्यानं मग केलं काय?
  • Tourist spots in Uttarakhand : मे महिन्यात उत्तराखंडला जाणार असाल तर हरिद्वारपासून 2 तासावर असलेल्या या स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या
  • Aishwarya Rai: बिल गेट्सना कंपनी विकणाऱ्या श्रीमंत व्यक्तीची बायको असती ऐश्वर्या पण…, 5 सेलिब्रिटींसोबत होते प्रेमसंबंध
  • आप पक्षात महाभूकंप, राघव चड्ढासह 7 खासदार भाजपात; देशाच्या राजकारणात मोठी खळबळ!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in