• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोनाल्ड ट्रम्प यांना झोपेतून उठवण्यासाठी तरुणीची नियुक्ती? ‘मिस्ट्री गर्ल’ व्हायरल

August 12, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता ट्रम्प यांनी स्वतःला जागे करण्यासाठी एका तरूणीला कामावर ठेवले तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सोशल मीडियावर याबाबतच्या अफवा वेगाने पसरत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या मागे एक महिला उभी असल्याचे दिसत आहे. दावा केला जात आहे की, ट्रम्प यांना झोपेतून जागे करण्यासाठी या तरुणीला कामावर ठेवण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कामाच्या ठिकाणी डुलकी घेत असल्याच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. यापूर्वी ते माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची अनेकदा खिल्ली उडवत होते आणि त्यांना वारंवार ‘स्लीपी जो’ असं म्हणत होते. मात्र आता डोनाल्ट ट्रम्प हे कामाच्या ठिकाणी झोपत असल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर एक नवा दावा वेगाने व्हायरल होत आहे. त्यानुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एका विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. या महिला कर्मचाऱ्याचे काम बैठकीदरम्यान ट्रम्प यांना डुलकी लागल्यास त्यांना जागे करणे असल्याचे सांगितले जात आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, अनेक नेटकऱ्यांनी असा दावा केला आहे की, या महिलेकडे एक बजर आहे. ट्रम्प यांना झोप येत असल्याचे दिसल्यास ती हे बजर दाबते, असे म्हटले जात आहे.

ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल

10 ऑगस्ट रोजी ओव्हल ऑफिसमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांना झोप अनावर होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या विचित्र अफवांना सुरुवात झाली आहे. काही प्रेक्षकांच्या लक्षात आले की, ट्रम्प यांना जेव्हा डुलकी येत असल्याचे दिसत होते, तेव्हा त्यांच्या मागे उभी असलेली एक महिला आपल्या पोटावर हात ठेवत होती. त्यानंतर ट्रम्प यांचे डोळे उघडलेले दिसत होते.

Trump wakes up when she touches her belly.

Weird pic.twitter.com/qVgOtguwIQ

— Ethan Levins 🇺🇸 (@EthanLevins2) August 12, 2026

सोशल मीडियावर थिअरी व्हायरल

वरील घटनेनंतर सोशल मीडिया युजर्सनी या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध असल्याचा अंदाज बांधण्यास सुरूवात केली. त्या ‘मिस्ट्री गर्ल’कडे एक बजर असल्याचा दावा करण्यात आला. ट्रम्प यांना बैठकीदरम्यान पूर्णपणे झोपू नयेत, यासाठी या महिलेला कामावर ठेवण्यात आल्याची थिअरी मांडली जात आहे. नेटकऱ्यांच्या मते त्या महिलेने आपल्या पोटावर एक बटन लावले आहे. ट्रम्प यांना झोप लागल्याचे तिच्या लक्षात आले की, ती हे बटन दाबते आणि त्यामुळे ट्रम्प जागे होतात, असा दावा केला जात आहे. मात्र, अनेकांनी हा केवळ अफवा आणि विनोदाचा भाग असल्याचे म्हटले आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in