
इराण आणि अमेरिका युद्धात जगाला फटका बसत आहे. परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. अमेरिकेला स्वप्नातही वाटले नव्हते की, इतके जास्त दिवस युद्ध सुरू राहिल. मात्र, या युद्धात अमेरिकेला एका मागून एक मोठे धक्के बसताना दिसत आहेत. त्यामध्येच आता अमेरिकेतूनही डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसताना दिसत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने बुधवारी अचानक मोठी घोषणा केली. पेंटागॉन घोषणेत सांगितले की, नौदल सचिव जॉन फेलन आपले पद सोडत आहेत. एपीने याबाबत बातमी दिली आहे. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेत एका मागून एक दणके बसत आहेत. मात्र, नौदल सचिव जॉन फेलन यांच्या राजीनाम्याचे कारण पुढे आले नाही. मात्र, अमेरिकेतील लष्करातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांना डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय पटत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्या परिस्थिती अशी आहे की, इराणला अमेरिकेच्या नाैसेनेने घेरले आहे.
परिस्थिती तिथे एकदम नाजूक आहे. तेहरानकडून जहाजांना निशाणा बनवले जात आहे. अमेरिकेच्या तब्बल 7 युद्धनाैका इराणच्या खाडीत आहेत. अशावेळी नौदल सचिव जॉन फेलन यांनी राजीनामा दिला. हा एक फक्त राजीनामा नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. हा मोठा दुसरा राजीनामा इराणनंतरच्या युद्धात पडला आहे.
जॉन फेलन यांच्या राजीनाम्यानंतर आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे असलेले उपसचिव हंग काओ नौदल प्रमुख म्हणून कार्यवाहक पदभार स्वीकारत आहेत. हंग काओ यांना नाैसेनेत तब्बल 25 वर्षांचा कामाचा अनुभव आहे. त्यांनी वर्जीनियातून अमेरिकेच्या सीनेट आणि हाऊसची निवडणूक लढवली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू त्यांना मानले जाते.
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणसोबतचा युद्धाचा निर्णय अनेकांना आवडला नाही. त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगितले जात होते. हेच नाही तर इराणकडून अमेरिकेच्या लढाऊ विमानांना पाडण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प चांगलेच भडकले होते. हेच नाही तर त्या बैठकीत ते अधिकाऱ्यांवर जोरजोरात ओरडत होते. त्यांनी थेट इराणवर परमाणू हल्ला करण्याचा आदेश दिल्याचेही सांगितले जाते. मात्र, त्यांना लष्कराने रोखले.
Leave a Reply