• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एसी सुरू असताना रूममध्ये पाण्याची बादली का भरून ठेवतात? 99 टक्के लोकांना माहीत नसतं खरं कारण

April 23, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा सुरू झाला आहे, यंदाचा उन्हाळा हा फारच कडक असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पार हा 40 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला असून, उष्णता असाह्य होत आहे. उन्हाळ्यामध्ये घराला थंड ठेवण्यासाठी फॅनचा फार मोठा आधार असतो. मात्र यंदा उन्हाळाच एवढा आहे की, फॅनची देखील गरम हवा येत आहे, त्यामुळे अनेक जण घरात थंडाव्यासाठी एसीचा वापर करत आहेत. मात्र तुम्ही एका गोष्टीचं कधी निरीक्षण केलं आहे का? अनेक जण ज्या रूममध्ये एसी लावतात त्या रूममध्ये पाण्यानं भरलेली एक बादली ठेवतात, यामागे नक्की काय कारण असावं? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?

पाण्याची बादली का भरून ठेवतात? 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घर थंड ठेवण्यासाठी फॅन, कुलर अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तुलनेत एसी अधिक उपयोगी वाटतो, कारण एसीमुळे तुमचं घर लवकर थंड होतं आणि उन्हाळ्यात उडणाऱ्या धुळीपासून देखील तुमचं संरक्षण होतं. मात्र तुम्ही जेव्हा एकाच रुामध्ये वारंवार एसी लावता तेव्हा तो एसी हवेतील सर्व प्रकारची आर्द्रता शोषून घेतो. हवेत आर्द्रता
नसल्याने हवा कोरडी बनते. कोरडी हवा ही आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरते. कोरड्या हवेमुळे तुम्हाला त्वचेशी संबंधिक काही समस्या निर्माण होऊ शकतात.

एसी सुरू झाल्यानंतर हवा पूर्णपणे कोरडी होऊ नये, तिच्यामध्ये थोडी तरी आर्द्रता शिल्लक राहावी यासाठी अनेक जण रूममध्ये एसी सुरू केल्यानंतर रूममध्ये पाण्याची एक बादली भरून ठेवतात. अनेक जण हवेत आर्द्रता रहावी यासाठी काही महागड्या पर्यायांचा देखील वापर करतात, परंतु हा एक स्वस्त पर्याय आहे. बादलीमध्ये असलेल्या पाण्यामुळे हवेतील पूर्ण आर्द्रता
शोषली जात नाही. हवा पूर्णपणे कोरडी होत नाही. तुमच्या आरोग्यासाठी पोषक वातावरण त्या रूममध्ये राहतं, म्हणून अनेकजण एसी चालू केल्यानंतर त्या रूममध्ये एक बादली पाण्याने भरून ठेवतात.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 32 वर्षांचा जुना चित्रपट, ज्याने सनी देओल- अमिताभ बच्चन यांच्यात पाडली फूट; पुन्हा कधीच एकत्र केलं नाही काम
  • Sanjay Raut Press | जनआक्रोश मोर्च्यावरून वाद चिघळला; स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
  • मोठी बातमी! 2029 च्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार ठरला? रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
  • Jay Pawar : आता सुनेत्राताई पण 2029 मध्ये राष्ट्रवादीचा बारामती विधानसभेचा उमेदवार कोण? जय पवार यांची सूचक प्रतिक्रिया
  • Bhooth Bangla: ‘भूत बंगला’ने ‘धुरंधर 2’ला केलं ओव्हरटेक; हमजाची जादू पडतेय फिकी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in