
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली विमान अपघातात निधन झालं. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. अजितदादांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवत आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासमोर दुसरा तगडा उमेदवार नाहीय. त्यामुळे त्यांचा विजय पक्का मानला जातोय. बारामतीमध्ये मतदान सुरु असताना सुनेत्रा पवार यांचे सुपूत्र जय पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. “टक्केवारी वाढून मतदान व्हावं अशी आमची आशा आहे. 85 ते 90 टक्के वाटतं. काल सर्व पोलिंग एजंटन्सना फोन लावला. त्यांनी सांगितलं काम चालू आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील अशी आशा आहे. त्याच्याबद्दल आता काही सांगू शकत नाही. चार तारखेला बघूया” असं जय पवार म्हणाले.
“तुम्हाला माहितीय मी रोहित सिंहचा व्हिडिओ आधीच माझ्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेला. माझ्या मनात मी कायम बोलत आलो आहे, त्यांना अटक झाली पाहिजे. माझी पत्रकार परिषद पुढे ढकलली गेली, तरी मला आशा आहे” असं जय पवार बोलले. तपास यंत्रणावर रोहित पवार संशय व्यक्त करत आहेत. त्यावर जय पवार बोलले की, ‘मला माहितीय ते बोलले की मी थांबयाला पाहिजे. फायनल अहवाल येईपर्यंत’ “आम्ही आमच्यावतीने तपास यंत्रणांना सांगतोय आम्हाला लवकरात लवकर तो अहवाल द्यावा. सीआयडीची टीम पण चांगलं काम करत आहे, आमचा संपर्क आहे. मुख्यमंत्रीसाहेब कालच्या सभेत बोलले ते यात लक्ष घालतील” असं जय पवार म्हणाले.
मी सारखा मीडियासमोर येऊन ते बोलत नाही
अपघात की घातपात तुम्हाला काया वाटतं? “जो पर्यंत मला खरी माहिती मिळत नाही, तो पर्यंत लोकांची दिशाभूल करणं मला चुकीचं वाटतं. आपण तो पर्यंत थांबूया. सगळ्या तपास यंत्रणा व्यवस्थित काम करतायत. सीआयडीच्या टीमशी मी बोलतोय. मी पण त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे. मी सारखा मीडियासमोर येऊन ते बोलत नाही. पुढच्या दोन ते तीन आठवड्यात चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं” असं जय पवार बोलले.
2029 च्या उमेदवारीवर काय म्हणाले?
आता सुनेत्रावहिनी निवडणूक लढवत असल्या तरी 2029 मध्ये तुम्ही उमेदवार असाल या प्रश्नावर सुद्धा जय पवार यांनी उत्तर दिलं. “2029 मध्ये मला उमेदवारी मिळावी ही लोकांची मागणी आहे. पण मी एक छोटा कार्यकर्ता आहे. तसचं काम सुरु ठेवेन. मी उमेदवार व्हावा ही लोकांची मागणी आहे, माझी नाही” असं जय पवार बोलले.
Leave a Reply