• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणमध्ये अंगावर काटा आणणारे बॅनर, थेट शवपेट्यांवर..

July 19, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत असतानाच जगाची झोप उडाली. तेहरानमध्ये असे एक भले मोठे बॅनर लावण्यात आले ज्यात डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि त्यांच्या मुलांचे फोटो शवपेट्यांमध्ये दाखवण्यात आली. अमेरिकेच्या झेंडाही दिसत आहे. यावर लिहिण्यात आले की, खूनचा बदला खून.. रिपोर्टनुसार, अमेरिका आणि इस्त्रायल यांना मोठा संदेश देण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले. तेहरानमधील अनेक भागात अशाप्रकारची बॅनर लावण्यात आलीत. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते अली खोमेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील फक्त मोजतबा खामेनेई सोडले तर सर्वजण मारले गेले. आता ट्रम्प यांचे पूर्ण कुटुंब निशाण्यावर असल्याचे इराणकडून दाखवण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला मारून बदला घेणार असल्याचा मोठा संदेश इराणकडून देण्यात आला.

सरळ सरळ इराणकडून ही चेतावणी अमेरिका दिली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याची धमकी इराणी लोकांकडून सतत दिली जात आहे. पण पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे फोटो लावत अशाप्रकारची धमकी देण्यात आली. या बॅनरवर अमेरिकेचा झेंडा, व्हाईट हाऊस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबातील लोकांचे फोटो दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले आहे की, इराणकडून माझी हत्या करण्यात आली तर ते त्यांच्यासाठी मोठा विनाश असणार आहे. इराणने माझी हत्या करण्यापूर्वीच मी अमेरिकेच्या लष्कराला काही आदेश दिले आहेत. यासोबतच इस्त्रायलच्या गुप्तचर विभागाकडून अगोदरच अमेरिकेला सांगण्यात आले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणकडून रचला जात आहे.

अमेरिकेने स्पष्ट केले की, त्यात काही नवीन अपडेट नाही. काही वर्षांपूर्वी अशाप्रकारचा कट रचला जात होता. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इराणी लोकांमध्ये संताप वाढताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील सध्याची परिस्थिती बघता स्पष्ट आहे की, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अधिक भडकणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मतदार यादीवर आक्षेप घेताच संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; काय घडतंय?
  • अभिनेत्याने ऑनस्क्रीन वहिनीलाच बनवलं पत्नी; पतीपेक्षा चौपट कमावू लागल्याने आलेला दुरावा
  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in