• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! 2029 च्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार ठरला? रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य

April 23, 2026 by admin Leave a Comment


अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. अजितदादा जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होते तेव्हा,  पवार विरूद्ध पवार अशी लढत झालेलीच आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील पवार विरूद्ध पवार आमने-सामने होते. त्यामुळे भविष्यात पवार विरूद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आपल्याला नकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे. अजितदादांची शेवटी इच्छा होती की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे. पवार परिवार एकत्र आला पाहिजे, हे कितीही खरं असलं तरी देखील राजकीय दृष्टीकोणातून निर्णय घेत असताना तो सोपा निर्णय नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे  बोलताना त्यांनी असंही म्हटलं आहे की,  बारामतीमध्ये भविष्यात जय पवार यांच्याविरोधात युग्रेंद्र पवार असा देखील सामना होऊ शकतो. जरी लोकांची इच्छा नसली तरी देखील हे होईल.  पवारांची लीगसी कमी व्हावी म्हणून काही पक्ष प्रयत्न करत आहेत, अजितदादा आज असते तर पक्षाचं विलिनीकरण झालं असतं. लोकसभा निवडणुकीत पवारांविरोधात पवार उभे राहावेत अशी कुटुंब आणि लोकांची इच्छ नव्हती. मात्र तशी निवडणूक झाली. भविष्यात पवार साहेब जसं सांगतील त्याप्रमाणे होईल.  आम्ही सत्तेत जाणार होतो की दादां सत्तेतून बाहेर पडणार होते? हे आम्ही आत्ता सांगू शकत नाही.  मात्र अजितदादा यांनी मृत्यूपूर्वे जे काही बोललं आहे, ते पहावं असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी आपल्या विधानसभा उमेदवारीबद्दल देखील मोठं भाकीत केलं आहे. माझ्या मतदार संघात वेगळा दबाव आहे. माझ्या विरोधात तिथे पैशाचा वापर होतोय. मी कर्जत जामखेड मधून तिसऱ्यांदा लढणार आहे. मात्र राजकारणात उद्या काय होते ते आज कोणी सांगू शकत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मायकल जॅक्सनच्या भारत भेटीचा किस्सा, एकदा नव्हे तर दोनदा घेतली होती बाळासाहेब ठाकरेंची भेट, कारण…
  • MI vs CSK :आईच्या निधनानंतर मैदानात उतरला, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट, कोण आहे मुकेश चौधरी?
  • थेट गोळ्या घाला, जहजाचे तुकडे करा, ट्रम्प यांच्या आदेशाने जगात मोठी खळबळ, होर्मुझमध्ये भयंकर युद्धाला सुरुवात?
  • IPL 2026 : मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं, शतकी खेळीसह नोंदवले इतके सारे विक्रम
  • महाराष्ट्रावर दुहेरी संकट… अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण, कुठे दिला ऑरेंज अलर्ट?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in