• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मायकल जॅक्सनच्या भारत भेटीचा किस्सा, एकदा नव्हे तर दोनदा घेतली होती बाळासाहेब ठाकरेंची भेट, कारण…

April 23, 2026 by admin Leave a Comment


पॉप संगीताच्या जगातील किंग ऑफ पॉप म्हणून ओळखला जाणारा मायकेल जॅक्सनने 2009 साली जगाचा निरोप घेतला. मात्र आजही त्यांच्या नावाची जादू कायम आहे. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘मायकेल’ हा बायोपिक 24 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अँटोनी फुक्वा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात जाफर जॅक्सन मायकेल जॅक्सनची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने मायकेल जॅक्सनच्या भारत दौऱ्याशी संबंधित एक खास किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. मायकेल जॅक्सन 1996 मध्ये भारतात आला होता आणि त्या दौऱ्यात त्याने मुंबईत दोन वेळा बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी भेट दिली होती. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतात येण्याचं होतं मोठं स्वप्न

मायकेल जॅक्सन यांना भारतात आणण्यामागे विझक्राफ्ट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मोठा वाटा होता. कंपनीचे सह-संस्थापक आणि संचालक आंद्रे टिमिन्स यांनी TV9 शी बोलताना सांगितले की, मायकेल जॅक्सन दोन देशांच्या दौऱ्याची योजना करत होते आणि त्यांची भारतात येण्याची विशेष इच्छा होती. त्यांना भारतात येऊन व्हिडिओ शूट करायचे होते, मदर तेरेसा यांची भेट घ्यायची होती, ताजमहाल पाहायचा होता आणि भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा होता.

बाळासाहेबांची भेट

आंद्रे टिमिन्स यांनी सांगितले की, मायकेलच्या टीमसोबत चर्चा झाल्यानंतर ते भारतात येण्यास तयार झाले. मात्र मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सरकारी सहकार्य आवश्यक असल्याने मायकेलला बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घ्यावी लागेल, असे त्यांच्या टीमला सांगण्यात आले. ताकण त्या काळात ट्रॅफिक आणि सुरक्षा व्यवस्थापनासाठी सरकारच्या मदतीची गरज होती. आम्ही मायकेलच्या टीमला सांगितले होते की, त्यांना काही मान्यवर व्यक्तींना भेटावे लागेल. सुरुवातीला त्यांची टीम तयार नव्हती, पण भारतासाठी मायकेलने होकार दिला.

बाळासाहेब ठाकरे यांनी भेट दिली तलवार

मायकेल जॅक्सन मुंबईत पोहोचल्यानंतर विमानतळावरून बाहेर पडताच त्याने आपली गाडी थांबवली आणि झोपडपट्टी भागात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली. त्यांनी जवळपास अर्धा तास मुलांशी संवाद साधला आणि त्यांना चॉकलेट्स व खेळणीही दिली. यानंतर ते थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी गेले. आंद्रे टिमिन्स यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे आणि मायकेल जॅक्सन दोघांनीही काळे चष्मे घातले होते. त्या भेटीत राज ठाकरे, बप्पी लाहिरी आणि इतर काही लोक उपस्थित होते. बाळासाहेब मराठीत बोलत होते आणि मायकेल इंग्रजीत. मी दोघांमध्ये भाषांतर करत होतो. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मायकेल जॅक्सनला तलवार भेट दिली तर जॅक्सनने बाळासाहेबांना खास हॅट भेट दिली. बाळासाहेबांनी मायकेलला सांगितले होते की, आपल्यामध्ये अनेक गोष्टी समान आहेत. आपण दोघेही कलाकार आहोत. मला तुमची गाणी खूप आवडतात आणि तुम्ही भारतात आलात याचा मला आनंद आहे.’

दुसऱ्यांदा घरी जाऊन घेतला इडली-सांबारचा आस्वाद

बाळासाहेब ठाकरे यांनी मायकेलला पुन्हा घरी येण्याचं निमंत्रण दिलं आणि दक्षिण भारतीय जेवण चाखण्यास सांगितलं. भारत दौरा संपण्यापूर्वी मायकेल जॅक्सन पुन्हा एकदा त्यांच्या घरी गेला आणि तिथे त्यांनी इडली-सांबारचा आस्वाद घेतला. यानंतर ते ओबेरॉय हॉटेलमध्ये परतले.

आशा भोसले आणि प्रभुदेवाची भेट

ओबेरॉय हॉटेलमध्येही मायकेल जॅक्सन यांनी अनेक मुलांची भेट घेतली. त्यांनी तिथे एका कॅलेंडरसाठी शूटिंगही केलं. याच हॉटेलमध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. अभिनेता आणि नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा तब्बल 48 तास त्यांची भेट घेण्यासाठी वाट पाहत होते. मायकेल जॅक्सन यांनी सर्वांची भेट घेतली होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : 6,6,6,6,6,6, संजूचा झंझावात, मुंबई विरुद्ध चाबूक शतक, ठरला पहिलाच फलंदाज
  • Horoscope : 24 एप्रिलच्या दिवशी पैशांचा पाऊस, वाचा नशीबवान राशींचा दिवस नेमका कसा असेल?
  • MI vs CSK : मुंबईने लाज घालवली, पलटणचा सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा
  • भाजपकडून कोण जाणार विधान परिषदेत? हालचालींना वेग, 30 नावांची यादी दिल्ली दरबारी…
  • IPL 2026 Playoff: पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित लांबलं, सीएसकेचा मार्ग झाला सोपा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in