• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्या सन्मानासाठी 8 महिलांची फाशी थांबवली… डोनाल्ड ट्रम्प यांचा तो दावा, इराणकडून थेट तोंडावरच..

April 23, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणने माझा सन्मान करत 8 आंदोलन करणाऱ्या महिलांची फाशी रोखली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने नवा वाद निर्माण झाला. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणकडून हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले.डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा करत म्हटले की, इराणने माझा सन्मान करत 8 महिलांची फाशीची शिक्षा रोखली आहे. त्यांनी ती शिक्षा रद्द केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, खूप जास्त चांगली बातमी… मला आताच कळाले की, इराणमध्ये ज्या 8 आंदोलन करणाऱ्या महिलांना फाशी दिली जाणार होती त्यांना आता मारले जाणार नाही. चार जणींना लगेचच सोडले जाईल, चार जणींना एक महिना जेलमध्ये राहावे लागेल, तशी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

मी खरोखरच याकरिता इराणचे काैतुक करतो. याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर इराणकडून हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. इराणची न्यूज एजन्सी मीजानने स्पष्ट केले की, या महिलांना फाशी देण्याबाबत काही निर्णयच झाला नाही. यापैकी काही महिलांना अगोदरच सोडण्यात आले.

त्यापैकी काहींवर असे आरोप आहेत की, त्यांना जेलची शिक्षा होणार. यामध्ये फाशीचा काही प्रश्नच नव्हता कधी. मीजानने म्हटले की, युद्धाच्या मैदानात काहीच मिळत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अशाप्रकारचे खोटे दावे केले जात आहेत. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तोंडावर पडल्याचे बघायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना खोटी माहिती मिळाल्याचेही इराणकडून सांगण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात काही गोष्टी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगितल्या जात आहेत, ज्या इराणकडून खोटून काढल्या जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात युद्धबंदी करार बैठक कधी होणार याबद्दल काही स्पष्टता नाही. होर्मुज खाडीत अमेरिकेकडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे इराण चिडला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 32 वर्षांचा जुना चित्रपट, ज्याने सनी देओल- अमिताभ बच्चन यांच्यात पाडली फूट; पुन्हा कधीच एकत्र केलं नाही काम
  • Sanjay Raut Press | जनआक्रोश मोर्च्यावरून वाद चिघळला; स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
  • मोठी बातमी! 2029 च्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार ठरला? रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
  • Jay Pawar : आता सुनेत्राताई पण 2029 मध्ये राष्ट्रवादीचा बारामती विधानसभेचा उमेदवार कोण? जय पवार यांची सूचक प्रतिक्रिया
  • Bhooth Bangla: ‘भूत बंगला’ने ‘धुरंधर 2’ला केलं ओव्हरटेक; हमजाची जादू पडतेय फिकी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in