• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगाला ज्याची भीती तेच घडले, थेट बॉम्ब..

April 18, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराण आणि अमेरिका युद्धात वेगवेगळे दावे केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या एकाही विधानावर ठाम नसल्याचे दिसत आहे. मध्येच युद्धबंदीबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहे तर मध्येच इराणला धमकी देत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इराणसोबतचे युद्ध संपवल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये पार्टी करणार असल्याचे बोलताना दिसते. व्हाईट हाऊसमधील पार्टीबद्दल बोलल्यानंतर काही तासातच त्यांनी पुन्हा इराणला धमकी दिली. ही धमकी अशी तशी नसून थेट पुन्हा इराणवर हल्ला करणारी होती. पत्रकारांसोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणसोबतचे सीजफायर पुढे ढकलण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. युद्धविराम पुढे ढकलणार नाही. जर परिस्थिती हीच राहिली तर आम्ही थेट इराणवर बॉम्ब टाकणार.

हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना म्हटले की, त्यांच्यासाठी 21 एप्रिलची डेडलाईन अत्यंत महत्वाची आहे. जर 21 एप्रिलपर्यंत निर्णय झाला नाही तर पुन्हा मध्य पूर्वेत युद्ध भडकू शकते, असे संकेत त्यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला वाटते की, हे होणार आहे. पण इराणचे म्हणणे आहे की, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, युद्धविराम थांबू किंवा नको पण आमची नाकेबंदी इराणच्या बंदरांवर कायम असणार आहे. इराणकडून स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिकेने नाकेबंदी काढावी नाही तर आम्हीही त्यांना चोखपणे उत्तर देऊ. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आता म्हटले की, आम्ही होर्मुजमधील नाकेबंदी काढणार नाहीत.

दुसरीकडे इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता घडामोडींना वेग आला. इस्लामाबादमध्ये खास बैठकीचे आयोजन करण्यात आले. सोमवारी ही बैठक पार पडणार आहे. रविवारी रात्री उशिरा दोन्ही देशांचे प्रतिनिधी पाकिस्तानमध्ये दाखल होतील. मात्र, पुन्हा एकदा होर्मुज खाडीत मोठा तणाव बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीतील तणाव कमी व्हावी, ही संपूर्ण जगाची इच्छा आहे. इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आली पण इराणच्या परवानगीशिवाय कोणतेही जहाज जाऊ शकत नाहीये.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, डीएत झाली इतकी वाढ, पगार किती वाढणार पाहा
  • आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना स्टार खेळाडू झाला वडील, गेल्या वर्षी केला होता दुसरा निकाह
  • Iran-US : काही तासात इराणने मारली मोठी पलटी, भारतासह सगळ्या जगाला धक्का
  • पायांवरील काळेपणा व कोरडेपणा दूर करण्यासाठी ‘या’ सोप्या घरगुती उपायांचा करा अवलंब
  • Chitra Wagh : 100 टक्के बुलडोझर फिरवा, TCS प्रकरणावर चित्रा वाघ यांची रोखठोक भूमिका, अजून जर असे कोणी खरात असतील, तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in