• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, डीएत झाली इतकी वाढ, पगार किती वाढणार पाहा

April 18, 2026 by admin Leave a Comment


DA Hike: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी दिलासा देत महागाई भत्ता म्हणजे डीएत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही वाढ केवळ २ टक्के आहे. परंतू दीर्घकाळानंतर आलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा मानला जात आहे. गेल्या काही काळापासून कर्मचारी संघटना सतत सॅलरी स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल करण्याची मागणी करत होते. खास करुन आठव्या वेतन आयोगासंदर्भात आशा वाढल्या होत्या. त्याच दरम्यान आता डीए वाढीचा निर्णय आला आहे.

२% DA वाढीला मिळाली मंजूरी

केंद्रीय कॅबिनेटने शनिवारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात २ टक्के वाढीला मंजूरी दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थोडी वाढ होणार आहे. मात्र, ही वाढ मर्यादित मानली जात आहे. कारण कर्मचारी दीर्घकाळापासून जास्त वाढीची अपेक्षा बाळगून होते.

८ व्या वेतन आयोगाची मागणी

कर्मचारी संघटनांनी सरकारकडून वेतन ढाच्यात मोठ्या बदलाची मागणी केली आहे. त्यांनी फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जर हा प्रस्ताव लागू झाला तर किमान वेतन १८ हजाराहून वाढून ६९,००० होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता म्हणजे डीएच्या घोषणेत यावेळी बराच उशीर झाल्याचे म्हटले जात आहे.
सर्वसाधारणपणे सरकार जानेवारी ते जूनच्या अवधीसाठी डीएचा निर्णय होळीच्या आसपास मार्चमध्ये करत असते. परंतू यावेळी असे झाले नाही. गेल्या १० वर्षात पहिल्यांदा डीएची घोषणा एप्रिलच्या महिन्यात करण्यात आली आहे. या आधी ऑक्टोबरमध्ये डीए ५५ टक्के वाढवून ५८ टक्के केला होता, जो एक जुलै २०२५ पासून लागू झाला होता.

किती वाढणार पगार ?

बेसिक पगाराच्या हिशेबाने महागाई भत्त्यातील वाढीचा परिणाम वेगवेगळ्या स्तरावर दिसणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन १८,००० रुपये आहे. त्याचा पगारात सुमारे ३६० रुपये प्रति महिना वाढ होईल.तर २९,२०० रुपये बेसिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्या सुमारे ५८४ रुपयांचा फायदा होईल. ५६,१०० रुपये बेसिक वेतन मिळणाऱ्यांच्या मासिक पगारात १,१०० रुपयांहून जास्त वाढ पाहायला मिळू शकतो. तर ज्यांचे बेसिक वेतन २,५०,००० रुपये आहे. त्यांच्या पगारात ५,००० रुपये महिना वाढू होऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: विराट कोहलीने खेळण्याच्या शैलीत असा केला बदल, फक्त 10 चेंडूत सर्व काही कळून जाईल
  • मारुती सुझुकी अर्टिगाचा देशात धुमाकूळ, एका वर्षात विकल्या तब्बल 2 लाख गाड्या
  • इंग्रजी फ्लॉप पण हिंदी सुपरहिट, 60 लाख बजेट अन् कमाई 5 कोटी, जिंकले 7 फिल्मफेयर, गाण्यांनी तर रचला इतिहास
  • Women Politics: जगातील या देशात महिला खासदारांची संख्या सर्वाधिक, सर्वात आघाडीवर हे राष्ट्र, यादीच पाहा
  • गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी केळ्याच्या मुळाचा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in