
“TCS सारख्या कंपनीत विशाखा सारख्या कमिटी मध्ये तक्रार आल्याचे उत्तर नव्हते. हा कायदा फक्त शासकीय स्थापनेत नाही तर खाजगी आस्थापनेत पण आहे. महिला व मुली नाईलाजाने या गोष्टी सहन करतात. पॉश ॲक्ट मध्ये बदल होणं गरजेचं आहे. ज्या कंपनीच्या सहली जातात तिथे पण महिलांचा छळ केला जातो. व्हॉट्सॲप मध्ये चॅटिंग मधून देखील महिलांना छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे याच्यात बदल होणं गरजेचं आहे” असं आमदार आणि भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या. “10 पेक्षा जास्त महिला असेल तिथे पॉश ॲक्ट लागू होतो. हे एक विभागाचे काम नाही. यासाठी flying scod निर्माण केला गेला पाहिजे. ज्या गोष्टी कायद्यात सांगितल्या आहेत, त्याच्या तरतुदी झाल्या पाहिजेत. या कायद्यात अट टाकली पाहिजे जेणेकरून ते सरकारी दरबारी आलं पाहिजे. 90 दिवसाच्या आत न्याय नाही मिळाला तर दंड झाला पाहिजे अशी पण एक तरतूद यात केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहोत. sop बनवून ती लागू करावी यासाठी मागणी करणार” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
“महिला आयोगाचे पद जरी रिकामे असले तरी बाकीचे अधिकारी काम करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील भेटलो. बारामतीचे इलेक्शन झाल्यानंतर महिला आयोग पद भरले जाईल. कारण ते पद राष्ट्रवादीकडे होते. ज्या महिलांवर छळ करण्यात आले ते लांडगे आहेत. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. एक दोघांना ठेचले पाहिजे. अनेक महिला पुढे येत नाहीत. मात्र माझ्या प्रयत्नांना यश येईल. मी त्याचा पाठपुरावा करणार आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
‘एखाद्याला पकडणे सोपे पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणे अवघड’
“अशोक खरात यांना पण ठेचण्याचे काम सुरू आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही. तीन महिन्या अगोदर ही कुणकुण लागली होती. त्याचे पुरावे आले. मग खरातवर कारवाई झाली. एखाद्याला पकडणे सोपे पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणे अवघड असते. खरातच्या मागे ईडी, एसआयटी, सीबीआय सगळे लागलेले आहे. रोज त्याची प्रकरण बाहेर येत आहेत. महिलाना सांगते, अजून असे कोण खरात असतील, ज्याने गैरफायदा घेतला असेल त्यांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात. त्यांना आपण शिक्षा दिल्या शिवाय राहणार नाही” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
‘100% बुलडोझर चालला पाहिजे’
“100% बुलडोझर चालला पाहिजे. आमची भूमिका आहे. TCS मधील आरोपींना सोडणार नाही. खरात याला पण सोडणार नाही. तेजस्वी सातपुते सारख्या कर्तृत्वान अधिकारी खरात प्रकरणाचा तपास करत आहेत. येणाऱ्या दिवसात रिझल्ट हे मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला विश्वास आहे ते नक्की हे काम पूर्ण करतील” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
Leave a Reply