• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपी रमेश म्हात्रे यांना व्हीआयपी ट्रीटमेंट, कल्याण कोर्टात वकील आणि पोलिसांत जुंपली…

July 10, 2026 by admin Leave a Comment


डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.  कोर्टाने मुख्य आरोपी नगर रमेश म्हात्रे यांच्या सह तिघांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  यावेळी रमेश म्हात्रे याच्या संरक्षणासाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा नेमण्यात आला होता. त्यामुळे  पोलीस आणि वकील यांच्यातच  धक्काबुक्की झाली.  यावेळी आरोपीला आरोपीसारखे आणा, आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली जात आहे असा सवाल करीत वकीलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना शिवसेना एकनाथ शिंदे यांचे नगर सेवक रमेश म्हात्रे आणि त्याच्या तीन सहकार्यांनी डॉक्टरांनी जबर मारहाण केली होती. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज जारी झाले होते. त्यातून या घटनेची तीव्रता जाणवल्याने विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला. या प्रकरणात अधिवेशनात शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई केली होती.

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपींना आज कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील मुख्यआरोपी नगर सेवक रमेश म्हात्रे याने गुन्हा दाखल होताच तब्येत बरी नसल्याचे सांगत रुग्णालयात दाखल करुन घेतल्याने विरोधकांनी टीका केली आहे.त्यातच आज रिमांडसाठी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात आणले तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आरोपी रमेश म्हात्रे यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप काही वकील आणि उपस्थितांनी केला यावेळी केला. कल्याण सत्र न्यायालयातील कोर्ट क्रमांक 6 मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग श्रीमती के. एस. कातकडे यांच्या दालनात या प्रकरणाची सुनावणी झाली. आरोपींचे वकील एड. आनंद पथकी आणि सरकारी वकील एड. आनंद आढसकर यांनी आपआपल्या बाजूचा युक्तिवाद सुरू केला.

कोर्टातच पोलीस आणि वकील वादंग

सुनावणीदरम्यान केवळ तक्रारदार, आरोपी, संबंधित वकील आणि सरकारी वकील यांनी उपस्थित राहावेत, असे न्यायालयाचे निर्देश असल्याचे पोलिसांनी सांगत परिसर रिकामा करण्यास सांगताना काही वकिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप वकील संघटनेने केला. हा परिसर न सोडल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप वकिलांनी केला आहे. या प्रकरणात आंदोलनाचा इशारा वकीलांच्या संघटनांनी दिला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in