• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डिलिव्हरी बॉय महिलेच्या घरात बळजबरीने घुसला; शौचालयातून बाहेर येताच…,अश्लील कृत्याचा व्हिडिओ व्हायरल

July 13, 2026 by admin Leave a Comment


बंगळुरूमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने डिलिव्हरी बॉयवर गंभीर आरोप केल्याने खबबळ उडाली आहे. महिलेच्या नकारानंतरही डिलिव्हरी बॉय बळजबरीने घरात घुसला. त्यानंतर शौचालयाचा वापर केल्यानंतर अश्लील कृत्य केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महिलेने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. महिलेसोबत घडलेल्या प्रकरानंतर सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयवर कारवाईची मागणी केली जात आहे. पीडित महिलेने सांगितले की, ‘डिलिव्हरी बॉय हा घरी एक पार्सल देण्यासाठी आला होता. पार्सल दिल्यानंतर महिलेला शौचालय वापरण्याची परवानगी मागितली. महिलेने डिलिव्हरी बॉय अनोळखी असल्याने परवानगी नाकारली.

महिलेने सोशल मीडियावर संपूर्ण प्रकार सांगितला आहे. महिलेने सांगितले की, ‘डिलिव्हरी बॉयला घरात घुसण्यास नकार दिला. तिने स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतरही बळजबरी घरात घुसला. तो मदत बाजुला राहणाऱ्या पुरुषाकडे मागू शकला असता. मी वारंवार नकार दिल्यानंतरही बळजबरीने घरात शिरला. त्याने घराबाहेर चप्पल काढली. त्यानंतर माझ्या परवानगीशिवाय बळजबरीने घरात शिरला’ .महिलेने डिलिव्हरी बॉयवर गंभीर आरोप करताना म्हटलं की, ‘शौचालयातून बाहेर आल्यानंतर प्रायव्हेट पार्ट दाखवला. त्याच्या कृत्याने घाबरून गेली’.

 

A Flipkart delivery agent in Bangalore forced his way into a woman’s flat despite her repeated “NO”. He ignored her boundaries, entered her washroom, and then EXPOSED himself to her.

She was terrified in her own home. Kept her camera on & door open, fearing for her life.

A… pic.twitter.com/JQHScytaCT

— ज़िद्दी नागरिक (@ZiddiNaagrik) July 11, 2026

महिलेने सांगितला संपूर्ण प्रकार

‘शौचालयातून बाहेर आलेल्या नराधमाने माझ्यासमोर अश्लील कृत्य केलं. मला माझ्याच घरात असुरक्षित वाटलं. मला खूप अपमानजनक वाटलं. मी एकदा त्याला घरात यायला परवानगी दिली नाही, तर त्याने घरात प्रवेश करायचा नव्हता. कोणत्याही पुरुषाला महिलेच्या घरात बळजबरीने घरात खुसण्याचा अधिकार नाही, असे महिलेने म्हटलं. डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने जीव घाबरून गेला होता. मी या कठीण प्रसंगात थोडं धैर्य दाखवलं. भीती वाटत असतानाही मोबाईलचा कॅमेरा सुरूच ठेवला. मी घराच्या मेन दरवाजावर उभी राहिली. त्याने काही केल्यास ओरडून घराबाहेर पळण्याच्या तयारीत होते, असे तिने पुढे सांगितले.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in