• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डिमार्टचा मोठा निर्णय, तब्बल 7 शहरांमधील सेवा बंद, थेट मोठे कारण पुढे..

July 17, 2026 by admin Leave a Comment


डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये किराणा मिळतो. लोक महिन्याभराचा किराणा तेथूनच भरतात. डिमार्टमध्ये किराणा भरला की, पैशांची मोठी बचत होते. एमआरपीपेक्षा खूप जास्त स्वस्त वस्तू डिमार्टमध्ये मिळतात. जवळपास लोक डिमार्टमधूनच घरात लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात. सर्वात विशेष बाब म्हणजे एकाच छताखाली आपल्याला सर्वकाही मिळते. मात्र, ब्लिंकिट, स्विगी मार्ट, झेप्टो अशा काही कंपन्यांमुळे कुठे ना कुठे डिमार्टला फटका बसताना दिसत आहे. वाढत्या स्पर्धेचा फटका डिमार्टला बसत आहे.ज्यामुळेच डिमार्टने मोठा निर्णय घेतला. डिमार्ट रेडी या ऑनलाईन किराणा डिलिव्हरी सेवेचा गाशा डिमार्टने तब्बल 7 शहरांमध्ये गुंडाळण्याचा निर्णय घेतला. याबाबत एव्हेन्यू ई कॉमर्स लिमिडेटचे संचालक आणि सीईओ विक्रम दासू यांनी कंपनीच्या 2027 च्या धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली.

आमचे बिझनेस मॉडेल मोठ्या महानगरांमध्ये अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. आम्ही पुढच्या 3 महिन्यात 7 शहरांमधील ऑपरेशन बंद करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. कारण या ठिकाणच्या सेवांचा महसूलचा वाटा फार जास्त कमी होता. डिमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी क्विक कॉमर्स क्षेत्रातील आपली गुंतवणूत वाढवली आहे. डिमार्टमध्ये इतके लोक खरेदी करतात.

मोठी कमाई डिमार्ट करते, असे लोकांना वाटते. मात्र, काही शहरांमध्ये डिमार्टलाही फटका बसताना दिसत आहे. डिमार्टने स्पष्ट केले की, त्यांचे लक्ष्य महानगरांकडे असणार आहे. ज्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उत्पन्न कमी होते, अशा ठिकाणच्या सेवा बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. डिमार्टमध्ये अनेक सवलती आपल्या ग्राहकांना दिल्या जातात. एका वस्तूवर दुसरी वस्तू मोफतमध्ये ही सवलत देखील डिमार्टमध्ये कायम असते.

डिमार्टमध्ये सोमवारी ग्राहकांसाठी मोठी ऑफर ठेवली जाते. विविध गोष्टींवर सवलती असतात. कोणताही सण उत्सव आला की, त्यासंदर्भातील गोष्टींवर डिमार्टमध्ये वेगवेगळ्या सवलती बघायला मिळतात. पावसाला सुरूवात झाल्याने पावसाळ्यात लागणाऱ्या गोष्टींवर विविध प्रकारच्या सवलत डिमार्टकडून दिल्या जात आहेत. छत्री, रेनकोड आणि पावसाळ्यामधील चप्पलवर डिस्काऊंट सध्या सुरू असल्याचे बघायला मिळतंय.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai News : केळी विकायला चाललेल्या मुंबईतील सुनीता मोरे मृत्यू प्रकरणाला नवीन वळण, फजुल रहमानने तिला दुकानात नेलं आणि..
  • Pratap Sarnaik : 39 कोटींचं टेंडर 160 कोटींवर नेलं, भाजप आमदाराचा मंत्री प्रताप सरनाईकांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
  • New Delhi Crime | महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, नेमकं घडलं काय?
  • LPG Cylinder: आता उद्यापासून थेट कनेक्शन बंद…1 सप्टेंबरपासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल
  • Bandra: 15 वर्षांनी घरात पाळणा हलला, पण एका चुकीने हिरावला एकुलता एक मुलगा; आईला अजूनही विश्वास बसेना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in