
हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. सदर महिला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिचं बाळ पोटातचं दगावल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशानाणे डीझेल नसल्याच कारण देत गरोदर मातेला रुग्ण वाहिका नाकारली होती. प्रायव्हेट वाहिकेतुन हिंगीलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले, मात्र उशीरा पोचल्याने आईच्या पोटात बाळ दगावल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे एकच खळबळ माजली असून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply