• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या या खासदारावर एकनाथ शिंदे नाराज, थेट सर्व खासदार आणि आमदारांना..

June 25, 2026 by admin Leave a Comment


उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर लोकसभा अध्यक्षांना पत्र देत थेट स्वतंत्र गट स्थापन केला. या बंडखोरीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे. संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीनंतर ईशान्य मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. यादरम्यानच संजय राऊत सर्व 6 फुटीर खासदारांवर जोरदार टीका करताना दिसले. यामध्येच आता खासदार संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित झाले. दरम्यान राऊतांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात लेटर बॉम्ब टाकला आहे. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यामुळे संजय दिना पाटील धमक्या देत असल्याची तक्रार त्यांनी केली.

संजय दिना पाटील थेट राऊतांवर वारंवार बोलताना दिसत आहेत. खासदार संजय दिना पाटील यांनी संजय राऊतांबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे नाराज असल्याचे कळतंय. संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यातील वाद पुढे जात असतानाच आता त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली. संजय राऊत यांच्याबद्दल संजय दिना पाटील यांनी केलेल्या विधानावर एकनाथ शिंदे नाराज आहेत.

वेढ्यासारखी वक्तव्य खासदारांनी करू नये अशा सर्व खासदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडून सूचना देण्यात आल्यात.  वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, पक्षाची बदनामी होईल अशी वक्तव्य आमदार खासदार यांना करू नयेत अशी सर्व नेत्यांना सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

खासदार संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यातील वाद वाढत आहे. संजय दिना पाटील यांनी थेट म्हटले होते की, मला जर मारण्यासाठी येत असाल तर एकतर जिवाचा विमा काढून घ्या किंवा मेडिक्लेम काढा. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in