• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ठाकरेंसाठी रात्र वैऱ्याची, उद्या शिंदे डाव टाकणार, थेट…; पुन्हा एकदा उबाठामध्ये सर्वात मोठा भूकंप

June 16, 2026 by admin Leave a Comment


अखेर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही चार्टड विमानाने दिल्लीत दाखल होत आहेत. त्यामुळे आजची रात्र ठाकरेंसाठी वैऱ्याची आहे. तर एकनाथ शिंदे हे उद्या मोठा डाव टाकणार आहे. हा डाव टाकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे मोठी फूट पडणार आहे. ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामुळे उद्याच्या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बाकचौरे आणि खासदार राजाभाऊ वाजे आदी सहा खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या सोबत आज रात्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि हे सहाही खासदार एकत्र येऊन लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उद्याच डाव

दरम्यान, उद्या सहाही खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहे. यावेळी फुटीर खासदार वेगळा गट स्थापन करत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत. यावेळी त्यांच्या संसदीय नेत्याचं नावही लोकसभा अध्यक्षांना देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, हे सहाही खासदार वेगळा गट करणार की शिंदे गटात सामिल होणार हे आज रात्रीच ठरणार आहे. त्यामुळे या घडामोडींकडे देशाचं लक्षल लागलं आहे.

उद्या पत्रकार परिषद

अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत उद्या दिल्लीत एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी राऊत काय भूमिका मांडतात? काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे किती खासदार उपस्थित राहतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी आज एक ट्विट करून दिल्लीत रात्रीच घोडेबाजार होणार असल्याचा दावा केला आहे. या खासदारांना फुटण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपये अगाऊ रक्कम देण्यात येणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in