• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ठाकरेंच्या खासदारांना किती कोटी मिळणार? संजय राऊतांनी थेट आकडाच सांगितला, राजकारणात खळबळ

June 16, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे, ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे. अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी… आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे! असं राऊत यांनी म्हटलं आहे. या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. त्यामुळे आज रात्री मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे समोर आले आहे.

ठाकरेंचे खासदार दिल्लीत

राज्यात गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही खासदार दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे दिल्लीला गेले आहेत. या खासदारांना 15 कोटी रुपये दिले जाणार असल्याचे विधान राऊत यांनी केले आहे.

अपना सपना मनी..मनी!
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी
१५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!@Dev_Fadnavis

— Sanjay Raut (@rautsanjay61) June 16, 2026

वेगळा गट स्थापन करणार…

सूत्रांनी दिलेल्या मागितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा स्थापनादिन आहे. याच्या आधीत हे सर्व खासदार आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचे समोर आले आहे. हे खासदार उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले जाणार असल्याचेही समोर आले आहे. यानंतर हा गट दुसऱ्या एखाद्या पक्षात सामील होऊ शकतो आणि एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in