
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. मनोज जरांगे हे या वर्षी देखील मुंबईत आझाद मैदानावर येऊन उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईला जाऊन उपोषण करणार असल्याची घोषणा केली. जरांगेंनी उपोषणाच्या 15 व्या दिवशी चलो मुंबईचा नारा दिला. आंदोलनाला येऊ न शकणाऱ्या मराठा बांधवांनी गाडीने आंदोलकांना मुंबईला सोडावे, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे सरकारने त्यांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी दिलेली नाही. त्यानंतरही जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. दौऱ्याच्या पाचव्या दिवशी येऊन आझाद मैदानात येऊन उपोषण करणार असल्याचे जरांगेंनी सांगितले. आता मार्गात फडणवीस आणि पोलिसांनी बॅरिकेट्स टाकू नयेत, असेही आवाहन जरांगे यांनी केले.
कसा असेल मार्ग?
मनोज जरांगे यांच्या मुंबईला जाण्याचा मार्ग देखील ठरला आहे. जरांगे यांचा मुंबईला जाताना पहिला मुक्काम हा पाटोदा येथे असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीगोंदा येथे मुक्काम होईल. तर तिसऱ्या दिवशी हडपसर येथे मुक्काम होईल. तर चौथ्या दिवशी खोपोली येथे पोहोचणार. त्यानंतर पाचव्या दिवशी आंदोलक आझाद मैदानात पोहोचतील. चौथ्या आणि पाचव्या दिवशी मुक्काम हा आझाद मैदानावर होईल.
जरांगेंनी काय म्हटलं?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही ज्या रस्त्याने मुंबईला जाणारे या रस्त्यावरील न येणाऱ्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सहकुटुंब यायचं आहे. जातीसाठी एक दिवस आम्हाला आशीर्वाद द्यायला यायचं आहे. मुंबईला न येणारा जो गरीब, शेतकरी, कष्टकरी मराठा आहे, त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यायला यायचे. ज्यांच्याकडे गाड्या आहेत, पण ते मुंबईला येऊ शकणार नाही, त्यांनी आम्हाला त्यांच्या गाड्या घेऊन मुंबईला सोडायला यावे’. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या भावनिक आवाहनावर राजकीय नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
Leave a Reply