• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Madhuri Elephant: ‘माधुरी’ कोल्हापुरात परतताच अनंत अंबानी ‘एक्स’वर ट्रेंड; नेटकऱ्यांनी मानले आभार

September 12, 2026 by admin Leave a Comment


Madhuri Elephant: कोल्हापूरची लाडकी हत्तीण माधुरी अखेर उपचारानंतर आपल्या घरी परतली आहे. माधुरीला उपचारासाठी गुजरातमधील वंतारा इथं नेण्यात आलं होतं. उपचार आणि विशेष काळजी घेतल्यानंतर तिची कोल्हापुरात पुन्हा घरवापसी झाली आहे. माधुरी परतल्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला जात असून, अनेक नेटकरी वंतारा टीम आणि अनंत अंबानी यांचे आभार मानताना दिसत आहेत. माधुरीच्या उपचारादरम्यान तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. आता ती पुन्हा कोल्हापुरात परतल्याने तिच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माधुरीच्या घरवापसीबाबत अनेक प्रतिक्रिया उमटत असून, अनंत अंबानी आणि वंतारा टीमच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘माधुरी सुरक्षितपणे कोल्हापुरात परतली आणि वंतारा टीमची मेहनत पाहून खरोखर अभिमान वाटतो. अनंत अंबानी यांचे आभार.’ आणखी एका युजरने माधुरी उपचारानंतर आनंदी दिसत असल्याचं म्हणत, तिची प्रेमाने काळजी घेतल्याबद्दल वंतारा आणि अनंत अंबानी यांचे आभार मानले आहेत. काही नेटकऱ्यांनी माधुरीच्या उपचारांकडे आणि आरोग्याला प्राधान्य देण्यात आल्याचं कौतुक केलं. ‘माधुरी उपचार घेऊन घरी परतली. तिच्या आरोग्याला प्राधान्य दिल्याबद्दल अनंत अंबानी आदरास पात्र आहेत,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.

पहा व्हिडीओ-

Madhuri safely Kolhapur wapas aa gayi, aur Vantara Team ki dedication dekhkar genuinely proud feel hota hai. Thank you Anant Ambani. pic.twitter.com/FPTJ7OnwqE

— diva (@Hri0shi_ta0) September 12, 2026

माधुरीची कोल्हापुरात झालेली घरवापसी अनेकांसाठी भावूक करणारा क्षण ठरला आहे. ‘कोल्हापुरात माधुरीला पुन्हा पाहणं खूप खास आहे. वंतारा टीमने ज्या पद्धतीने तिची काळजी घेतली, त्यासाठी अनंत अंबानी यांचे मनापासून आभार,’ असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. दरम्यान, माधुरीवर दीर्घकाळ विशेष उपचार करण्यात आले आणि त्यानंतर तिला पुन्हा कोल्हापुरात आणण्यात आलं. तिच्या उपचारांसाठी आणि काळजीसाठी वंतारा टीमने केलेल्या प्रयत्नांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. माधुरीची सुखरूप घरवापसी झाल्याने तिच्याशी भावनिक नातं असलेल्या कोल्हापूरकरांमध्येही समाधान व्यक्त केलं जात आहे.

2025 मध्ये माधुरीला गुजरातमधील जामनगर इथल्या अनंत अंबानी यांच्या वंतारा इथल्या हत्ती पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं होतं. तिच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर तिला विशेष उपचार आणि पुनर्वसनासाठी वंतारामध्ये नेण्यात आलं होतं. वंतारामध्ये तिच्यावर विशेष पशुवैद्यकीय उपचार, पुनर्वसन आणि हत्तींसाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधांमध्ये देखभाल करण्यात आली. तिच्या सांध्यांच्या समस्येसाठी उपचार करण्यात आल्याचीही माहिती आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Brics Summit 2026 : शी जिनपिंग यांनी भारतात येताना आपल्या राईट हँडलाही सोबत आणलय, कोण आहेत काई की ?
  • Madhuri Elephant: ‘माधुरी’ कोल्हापुरात परतताच अनंत अंबानी ‘एक्स’वर ट्रेंड; नेटकऱ्यांनी मानले आभार
  • ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे बनवण्यावर भर
  • माधुरीचं ब्लॉकबस्टर गाणं, जे ऐकताच आजही मनाला मिळते शांतता, इतकं लोकप्रिय की..
  • Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थीला फॉलो करा अभिनेत्रींचा खास लूक, फुलून दिसेल तुमचंही सौंदर्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in