
अभिनेत्री मलायका अरोरा ( Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे एकेकाळी बी-टाउनमधील चर्चेत असलेले कपल होते. त्यांच्या नात्याला चाहत्यांकडूनही मोठी पसंती मिळाली होती. मात्र, लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच दोघांचे मार्ग वेगळे झाले. आता मलायका पुन्हा एकदा चर्चेत आली असून, ती डायमंड व्यावसायिक हर्ष मेहता याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण या चर्चांमध्ये नेमकं किती तथ्य आहे?
का झालं मलायका-अर्जुन यांचं ब्रेकअप ?
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याचा शेवट नेमका का झाला, याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा सुरू आहेत. आता ‘हिंदी रश’सोबत झालेल्या संवादात विक्की लालवानी यांनी या नात्याबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. लालवानी यांच्या सांगण्यानुसार, मलायका आणि अर्जुन यांचं नातं अधिकृतपणे संपुष्टात येण्याच्या तब्बल 8 ते 10महिने आधीपासूनच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मला माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून मतभेद निर्माण झाले होते, असं लालवानी यांनी नमूद केलं.
मलायकाला लग्न करायचं होतं, पण अर्जुन या निर्णयासाठी तयार नव्हता, अशी चर्चा होती. कदाचित अर्जुन कपूरला लग्न करण्यात रसच नसावा, असंही लालवानी यांनी म्हटले. याच कारणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मला वाटते की, त्यांच्या ब्रेकअपमागे हेच मुख्य कारण असावे, असं ते म्हणाले.
मात्र, या दोघांचे नाते केवळ प्रसिद्धीसाठी किंवा टाइमपाससाठी नव्हतं, असंही लालवानी यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मते, मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या खरंच प्रेमात होते आणि त्यांचे नाते खूपच खोल होतं. अर्जुनच्या मनात आजही मलायकाबद्दल भावना असू शकतात, अशी शक्यता लालवानी यानी व्यक्त केली. तसेच, मलायकाच्याही मनात अर्जुनबद्दल अद्याप भावना असू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मात्र, प्रत्येक प्रेमकथेचा शेवट सुखदच होतो असेंनाही.
मलायका आणि हर्ष मेहता यांच्या नात्याची चर्चा किती खरी ?
अर्जुन कपूरसोबतचं नातं संपल्यानंतर आता मलायका अरोरा पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. ती डायमंड व्यावसायिक हर्ष मेहता याला डेट करत असल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये समोर आलं होतं. चर्चांबाबत विक्की लालवानी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या इंडस्ट्रीमध्ये मलायका आणि हर्ष मेहता रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला त्या दोघांनी दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे मलायका आणि हर्ष यांच्या नात्याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही.
कोण आहे हर्ष मेहता?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हर्ष मेहता हा डायमंड मर्चंट असून त्याचं वय 33 वर्षे असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याच्याही चर्चा आहेत. मलायका अरोरा सध्या 52 वर्षांची असून हर्ष हे तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले जाते. दोघेही काही प्रसंगी एकत्र दिसल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, मलायका किंवा हर्ष यांनी अद्याप आपल्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
Leave a Reply