• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ट्रेनमध्ये सोबत नेला तुपाचा डब्बा, तर सामान जप्त होणार… रेल्वेचा नियम वाचला का?

June 30, 2026 by admin Leave a Comment


Railway Guidelines Ghee: भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठा नेटवर्क आहे. एका दिवसात कोट्यवधी शेतकरी एका दिवसात दुसर्‍या ठिकाणापर्यंत प्रवास करतात. प्रवाशांची सुरक्षा, सुविधा आणि प्रवासदरम्यान एक व्यवस्था ठेवण्यासाठी वेळोवेळी अनेक नियम लागू होतात. अर्थात काही नियमांची माहिती प्रवाशांना नसते. त्यामुळे कळत-नकळत प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन होते. रेल्वे प्रवासात ज्वलनशील वस्तू, पदार्थ नेण्यासंदर्भात नियम आहेत. या वस्तू घेऊन प्रवास करता येत नाही. तर अटी आणि शर्तींसह काही सामान नेता येते. अशा नियमामुळे एक व्यवस्था टिकून राहते. तर यामुळे जोखीम आणि असुविधाही टळते. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करताना या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

तुपासंदर्भात रेल्वेचा नियम काय?

तुपाचा वापर भारतीय स्वयंपाक घरात केला जातो. अनेक अन्नपदार्थात तुपाचा वापर होतो. पण रेल्वे प्रवासात तूप नेताना काळजी घ्यावी लागते. सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने रेल्वेतून प्रवास करताना तूप व्यवस्थितरित्या डबाबंद करूनच नेता येते. जर तूप रेल्वेत सांडले. तर प्रवासी घसरून पडण्याची भीती असते. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. तूप, ज्वलनशील पदार्थांच्या श्रेणीत येते. त्यामुळे रेल्वेत आग लागण्याची शक्यता असते. रेल्वेतून तूप नेताना नियमांचे पालन करणे आवश्यक असते.

रेल्वेतून किती तूप नेता येते?

भारतीय रेल्वेने तुपाचा डब्बा घेऊन जाण्याविषयी काही नियम केले आहेत. प्रवासी ट्रेनमध्ये तूप घेऊन जाऊ शकतात. पण त्याची एक मर्यादा आहे. रेल्वे नियमानुसार, एक प्रवासी कमाल 20 किलोपर्यंत तूप घेऊन जाऊ शकतो. हे तूप सीलबंद, हवाबंद डब्यात नेता येते. त्यासाठी अर्थातच रेल्वे अधिकाऱ्याची, प्रशासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तुपाचा डब्बा हा चांगला पॅक असावा. तो घट्ट बंद असावा. पॅकिंग एकदम चांगले हवे. हा तुपाचा डब्बा उघडायला नको. तो सांडायला नको. उघड्या भांड्यात अथवा कमकुवत डब्ब्यात, प्लास्टिक बॉटलमध्ये तूप नेता येत नाही. सुरक्षित पॅकिंग नसले तर रेल्वे प्रशासन तुपाचा डब्बा जप्त करू शकते. डब्बा योग्यरित्या बंद करणे आवश्यक आहे.

रेल्वेचा हा नियम कशासाठी?

तूप हे दिसायला साधं वाटतं असलं तरी रेल्वेत ज्वलनशील पदार्थ आणता येत नाही. त्यामुळे जोखीम निर्माण होऊ शकते. जर तूप सांडले तर त्यावर प्रवासी घसरून पडू शकतात. तूप हे ज्वलनशील असल्याने आगीचा धोकाही असतो. किंगविषयी नियम कडक आहेत. जर 20 किलोंपेक्षा अधिक तूप नेल्यास कारवाई होऊ शकते. रेल्वेत अशा वस्तू नेण्याअगोदर नियम जाणून घेणे आवश्यक असते.

नियम तोडला तर काय?

जर एखाद्या प्रवाशाने नियमांचे पालन केले नाही तर रेल्वे त्याच्याविरोधात कारवाई करू शकते. अशा प्रकरणात सामान जप्ती केली जाऊ शकते. प्रवासाला दंड होऊ शकतो. गंभीर परिस्थितीत कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवासात सामान घेण्याविषयी काही नियमांचे पालन करावे लागते. त्यासाठी रेल्वे गाईडलाईन महत्त्वाची आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in