• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ketan Agarwal Murder Case : ‘केतनला संपवण्यासाठी एवढी मेहनत का, फक्त एकदा…’, पुणे हत्याकांडावर बड्या सेलिब्रिटीचं लक्षवेधी वक्तव्य

June 30, 2026 by admin Leave a Comment


Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील श्रीमंत उद्योजक केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. घडलेल्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार अमाल मलिक (Bollywood Singer Amaal Mallik) याने देखील एक्सवर एक पोस्ट करत प्रकारणावर संताप व्यक्त केला आहे. सध्या अमाल याची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

केतन हत्याकांडानंतर अमाल पोस्ट करत म्हणाला, ‘केतन याला संपवण्यासाठी एवढी मेहतन घ्यायची काय गरज होती. फक्त एक नाही म्हणाली असती तरी पुढे काही झालं असतं… दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे, असं तिने सांगायला हवं होतं… सांगून देखील त्याने ऐकलं नसतं, तर कुटुंबियांना सांगितलं असतं. आजच्या जगात महिलांसाठी अनेक कायदे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सुशिक्षित आणि कमावणाऱ्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध आणि तिच्या इच्छेविरुद्ध जाण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही…’

 

WHY 💔 pic.twitter.com/9vM7lTC9po

— Amaal Mallik (@AmaalMallik) June 29, 2026

 

‘कोणाचं तरी मुलं हिरावल्यानंतर आपण कसं आनंदी राहू शकतो… हत्येचा विचार करण्याची दोघांची हिंमत तरी झाली कशी? एक जीव गेला… कुटुंब उद्ध्वस्त झाली. राक्षस…”, असं देखील अमाल मलिकनं म्हटलंय. आणखी एका पोस्टमध्ये अमाल म्हणाला, ‘गेल्या अनेक वर्षांपासून पुरुषांकडून महिलांवर अत्याचार झाले आहेत. महिलांनी खूप काही सहन केलं आहे, त्या सर्व महिलांची मी माफी मागतो. पुरुषप्रधान विचारधारेला विरोध करणाऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. जे लोकं महिलांचा छळ करतात, त्यांना एक जनावराप्रमाणे वागवतात… अशा लोकांच्या विरोधात आवज उठवलाच पाहिजे. पण, प्रत्येक गोष्टीला ‘टॉक्सिक’ असं नाव दिल्यामुळेच आपण खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होतं. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी लग्न करणं देखील टॅक्सिक आहे… एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपवणं हे देखील तितकंच टॅक्सिक आहे…’

पुढे अमाल म्हणाला, ‘इन्स्टाग्रामवर दाखवण्यासाठी फक्त लग्न करायचं की, आनंदासाठी आणि प्रेमासाठी लग्न करायचं? लोणावळ्यात देखील सुंदर हनिमूनमध्ये तुम्ही आनंदी राहू शकता. त्यासाठी मालदिवलाच जाण्याची काहीही गरज नाही. या माणसासोबत जे झालं, ते नव्हतं व्हायला पाहिजे… तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तो आनंदी होता. केतन अग्रवाल खूप निर्मळ मनाचा आणि गोड वाटत होता… असं देखील अमाल याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in