• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs IND : टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली? जाणून घ्या

June 30, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20i मालिकेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. आयर्लंड विरुद्धच्या टी 20i मालिकेतील पराभव विसरुन टीम इंडिया कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना हा चेस्टर ली स्ट्रीटमधील रीव्हसाईड ग्राउंडमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यात येईल. श्रेयस अय्यर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या निमित्ताने टीम इंडिया इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध अखेरीस टी 20i मालिका केव्हा खेळली होती? हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाने अखेरीस 2022 साली इंग्लंडमध्ये यजमानांविरुद्ध टी 20i मालिका खेळली होती. तेव्हा त्या मालिकेत एकूण 3 टी 20i सामने खेळवण्यात आले होते. भारतीय संघाने पहिले सलग 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती. तर आता 4 वर्षांनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्ये टी 20i मालिका खेळणार आहे.

भारताला 2022 साली इंग्लंड विरुद्ध मालिका जिंकून देणाऱ्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचा समावेश होता. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ती मालिका जिंकली होती. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला मालिकावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं.

टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय

टीम इंडियाने 2022 सालच्या टी 20I मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला 50 धावांनी पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात 49 धावांनी इंग्लंडवर मात केली होती. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंडने लाज राखली होती. इंग्लंडने अंतिम सामन्यात 17 धावांनी विजय मिळवत भारताला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं होतं. भारताने अशाप्रकारे तेव्हा 2022 साली इंग्लंड विरुद्धची मालिका ही 2-1 फरकाने जिंकली होती.

टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद आणि ल्यूक वुड.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Weather Update : मुंबईकरांसाठी रात्र धोक्याची, मुसळधार पावसाचा इशारा; जुलैच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज आला
  • वडिलांनी जुळ्या बहिणींशी केलं लग्न; अभिनेत्रीला आजही माहीत नाही तिची खरी आई कोण?
  • 10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच, जाणून घ्या त्यांची किंमत
  • पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, ‘या’ ठिकाणांना द्या भेट
  • दोन पिढ्यांना वेड लावणारं ब्लॉकबस्टर गाणं, जे दोन चित्रपटात ऐकायला मिळालं, तरी त्यांची क्रेझ कमी नाही झाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in