• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

AUSW vs WIW : ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक, वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने धुव्वा

June 30, 2026 by admin Leave a Comment


ऑस्ट्रेलिया वुमन्स टीमने आपला दबदबा कायम राखत पुन्हा एकदा आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील सामन्यात वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने एकतर्फी फरकाने विजय मिळवला. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर 126 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 42 बॉलआधीच पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 13 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 127 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची आठवी वेळ ठरली आहे. आता ऑस्ट्रेलियासमोर अंतिम फेरीत कुणाचं आव्हान असणार? हे 2 जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत.

सामन्यात काय झालं?

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 125 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजसाठी कॅप्टन आणि ओपनर हॅली मॅथ्यूज हीने सर्वाधिक 30 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी डीएंड्रा डॉटीन हीने नाबाद 26 धावांची निर्णायक खेळी केली. त्यामुळे विंडीजला 100 हा आकडा गाठता आला. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन सोफी मोलिनिक्स, एश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वॉरहम या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाला विजयी करण्यात ओपनर बेथ मुनी हीने बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं. बेथने 36 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. बेथने या दरम्यान 8 चौकार लगावले. बेथ व्यतिरिक्त एश्ले गार्डनर हीने 20 बॉलमध्ये नॉट आऊट 35 रन्स केल्या. तसेच इतरांनीही ऑस्ट्रेलियाच्या विजयात योगदान दिलं.

ऑस्ट्रेलियाचा विजयी षटकार

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभूत करुन आपला विजयी रथ यशस्वीरित्या कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाचा हा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील सलग आणि एकूण सहावा विजय ठरला.

ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक

𝙎𝙄𝙈𝙋𝙇𝙔 𝙄𝙉𝙀𝙑𝙄𝙏𝘼𝘽𝙇𝙀 🔥

Australia book their place in the Women’s #T20WorldCup final for the eighth time in 10 editions 👏 pic.twitter.com/WdzzgNyjpm

— ICC (@ICC) June 30, 2026

दरम्यान उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. हा सामना 2 जुलै रोजी होणार आहे. आता या सामन्यात कोण मैदान मारतं याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Weather Update : मुंबईकरांसाठी रात्र धोक्याची, मुसळधार पावसाचा इशारा; जुलैच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज आला
  • वडिलांनी जुळ्या बहिणींशी केलं लग्न; अभिनेत्रीला आजही माहीत नाही तिची खरी आई कोण?
  • 10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच, जाणून घ्या त्यांची किंमत
  • पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, ‘या’ ठिकाणांना द्या भेट
  • दोन पिढ्यांना वेड लावणारं ब्लॉकबस्टर गाणं, जे दोन चित्रपटात ऐकायला मिळालं, तरी त्यांची क्रेझ कमी नाही झाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in