
'केजीएफ' स्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या 'टॉक्सिक' या चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित झाला. बेंगळुरूमध्ये या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री कियारा अडवाणीसुद्धा तिच्या भूमिकेविषयी आणि एकंदरीत अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
मी खरंच असं मानते की गीतू आणि यश यांनी मला या चित्रपटात नादिया बनण्यासाठी मॅनिफेस्ट केलं आहे. एक अभिनेत्री म्हणून मी इतकं निडर पाऊल उचलण्यासाठी तयार असल्याची भावना माझ्यात मनात येण्याआधीच त्यांनी मला त्या भूमिकेत पाहिलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला”, असं कियारा म्हणाली.
टॉक्सिक या चित्रपटातील माझी ही भूमिका मला करिअरमधील एक 'मैलाचा दगड' म्हणून लक्षात राहील. मला एक अशी भूमिका मिळाली आहे, जी एक अभिनेत्री म्हणून मला माझ्या करिअरसाठी खूप खास असेल. 'टॉक्सिक'नंतरची कियारा ही खूप वेगळी असेल”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
या चित्रपटातील गाण्यात, टीझर आणि ट्रेलरमधील कियारा-यश यांच्या इंटिमेट सीन्सवर बरीच टीका झाली. भूमिकेविषयी कियारा पुढे म्हणाली, “मी नादिया या भूमिकेचं वर्णन एका शब्दांत करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तो अनुभवच घ्यावा लागेल. यश आणि गीतू या दोघांनी मला अक्षरश: बिघडवलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनाही ही गोष्ट समजेल.”
'टॉक्सिक' हा चित्रपट येत्या 26 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यश आणि कियारा यांचे बरेच इंटिमेट सीन्स आहेत. यामुळे झालेल्या प्रचंड ट्रोलिंगनंतर कियाराने दिलेली ही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. या प्रतिक्रियेतून तिने हे सिद्ध केलं आहे की, टीकांनी तिला काही फरक पडत नाही.





Leave a Reply