• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टिपर-डंपरच्या सुरक्षेत मोठा बदल; 1 एप्रिल 2027 पासून कव्हरिंग सिस्टम अनिवार्य

August 13, 2026 by admin Leave a Comment


रस्त्यावर जाताना तुम्ही कधी एखाद्या उघड्या ट्रकच्या मागे गाडी चालवली आहे का, ज्यातून अचानक माती, वाळू किंवा मलबा तुमच्या वाहनावर पडण्याची भीती वाटत असते? किंवा झाकण नसलेल्या कचरा वाहून नेणाऱ्या डंपरच्या दुर्गंधीचा त्रास तुम्हाला कधी सहन करावा लागला आहे का? सर्वसामान्यांना दररोज भेडसावणाऱ्या या मोठ्या समस्येपासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण रस्त्यावर धावणाऱ्या उघड्या टिपर आणि डंपरमधून माती, वाळू, खडी किंवा मलबा खाली पडण्याच्या घटनांना आता आळा बसणार आहे. केंद्र सरकारने टिपर आणि डंपर वाहनांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे नवीन नियम लागू केले असून, 1 एप्रिल 2027 पासून या वाहनांवर माल झाकण्यासाठी विशेष कव्हरिंग सिस्टम बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे वाहनातून माल रस्त्यावर पडण्याचा धोका कमी होण्यासोबतच धूळ आणि कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण व दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार आहे.

सरकारने जारी केलं नवं नोटिफिकेशन

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 28 जुलै 2026 रोजी केंद्रीय मोटार वाहन (बारावी सुधारणा) नियम, 2026 अंतर्गत नोटिफिकेशन जारी केलं आहे. . ही अधिसूचना 7 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली. या नियमांमुळे केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी 20 मार्च 2026 रोजी या नियमांचा मसुदा प्रसिद्ध करून नागरिक आणि संबंधित क्षेत्रातील हितधारकांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यांचा विचार केल्यानंतर आता अंतिम नियम लागू करण्यात आला आहे.

टिपर-डंपरवर कसं असणार कव्हर ?

नवीन नियमांनुसार टिपर आणि डंपरच्या लोड बॉडीला वरून पूर्णपणे झाकणारी प्रणाली बसवावी लागेल. या कव्हरमुळे वाहनातून माती, वाळू, खडी किंवा इतर साहित्य बाहेर पडणार नाही.

ऑपरेटिंग सिस्टम : माल झाकणारी ही प्रणाली इलेक्ट्रिक, इलेक्ट्रो-मेकॅनिकल, हायड्रॉलिक किंवा मेकॅनिकल पद्धतीने चालवली जाऊ शकते.

ऑटोमेटेड यंत्रणा : याचा अर्थ असा की वाहनांमध्ये केवळ हाताने ताडपत्री बांधण्याऐवजी स्वयंचलित सिस्टीम बसवावी लागेल.

साहित्याबाबत मुभा : बॉडीच्या वरच्या भागाला झाकण्यासाठी कोणतेही योग्य आणि सुरक्षित साहित्य वापरता येईल. मात्र, वाहन चालू असताना माल पूर्णपणे झाकलेला राहणं, हे अत्यावश्यक आहे.

कव्हर उघडं राहिल्यास चालकाला मिळणार अलर्ट

नवीन नियमांमध्ये चालकाच्या सुरक्षेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. टिपर आणि डंपरच्या केबिनमध्ये ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट सिस्टम बसवणे आवश्यक असेल. जर वाहन चालू असताना लोड बॉडीचे कव्हर उघडं राहिलं किंवा ते व्यवस्थित लॉक झालं नसेल तर चालकाला आवाज आणि प्रकाशाच्या माध्यमातून तात्काळ इशारा मिळेल. यामुळे चालकाला कव्हर बंद करण्याची सूचना वेळेत मिळेल आणि रस्त्यावर माल पडण्याचा धोका कमी होईल.

कव्हरिंग सिस्टम बसवल्यानंतर वाहनाची एकूण उंची काही प्रमाणात वाढू शकते. मात्र, नियमांनुसार या कव्हरिंग सिस्टममुळे वाढलेली उंची वाहनाच्या निर्धारित एकूण उंचीच्या मोजमापात धरली जाणार नाही.

कधीपासून लागू होणार नियम ?

नवीन गॅझेट नोटिफिकेशन प्रकाशित झाल्यापासून नियमांमध्ये करण्यात आलेली सुधारणा लागू झाली आहे. मात्र, टिपर आणि डंपरवर कव्हरिंग सिस्टम बसवणं हे 1 एप्रिल 2027 पासून अनिवार्य असेल. यामुळे वाहन उत्पादक, मालक आणि संबंधित व्यावसायिकांना नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे. उघड्या टिपर आणि डंपरमधून मलबा पडणे हे मागून येणाऱ्या वाहनांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in