• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

झुरळं फार जास्त खंबीर निघाली.. संजय राऊत यांची सरकारवर थेट टीका..

July 20, 2026 by admin Leave a Comment


सोनम वांकचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की, सरकार मुलांना घाबलंय. सरकारला वाटले की, वांगकुच काय आहे किंवा अभिजीत दिपके काय आहे. यांना आम्ही किड्या मुंग्यांसारखे चिरडून टाकू. पण ही जी झुरळं आहेत, ही झुरळं फार जास्त खंबीर निघाली आहेत. संपूर्ण देशातून झुरळं बाहेर पडली आहेत. झुरळ्यांना पाठिंबा मिळत आहे. हे सरकार लोकशाहीवादी अजिबात नाही. लोकशाहीवादी असतं तर या झुरळ्यांना घाबरून मोर्चाची परवानगी नाकारली नसती. सोनम वांकचुक यांना जोर जबरदस्तीने पांढले कपडे लावून उचलून रूग्णालयात नेले नसते. सरकार या आंदोलनाला आणि आंदोलकांना सामोरे गेलं असतं. त्यांचा विषय समजून घेतला असता आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन या देशाच्या युवा पिढीचे समाधान केले असते.

पण या सरकारने तरूणांच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली, हे संतापजनक आहे. हजारो लाखो तरूण जंतरमंतरला जमले आहेत, सरकारविरोधात घोषणा देत आहेत. सरकारच्या हातात असतं तर त्यांनी या हजारो तरूणांच्या मागे ईडी लावली असती. मी तर असे आवाहन केले की, संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडकॉर्टरच्या दिशेने न्यावा.

पुढे संजय राऊत म्हणाले की, या देशाच्या बर्बादीमध्ये या सरकारचा सर्वात मोठा हात आहे. देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे. त्यामुळे संसदेबरोबर या गुलाम झालेल्या ज्या संस्था आहेत, मग ते सुप्रीम कोर्ट असेल किंवा ईडी असेल त्यांच्या दिशेने सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे. सुप्रीम कोर्ट जर गुलाम नसते तर राष्ट्रहिताचे निर्णय दिले असते. संविधानानुसार या देशाचे निर्णय झाले असते.

या देशातील प्रत्येक संविधानिक संस्था मोदी आणि शाहांची गुलाम आहे. यासोबतच घरगडी म्हणून काम करते. त्यात काही लपून राहिले नाही. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जा हे सांगू शकतात तर सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे लोक तर मग ते सरकारलाही निर्देश देऊ शकतात. या मुलांचे म्हणणे ऐकून घ्या आणि समाधान करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sonali Kulkarni: सलमानपेक्षा 9 वर्षांनी लहान असूनही का साकारली आईची भूमिका; सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली..
  • जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले…
  • मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणारी बातमी, रिपोर्ट दिसताच…खुद्द जरांगेंनीच व्यक्त केली शंका; काय घडलं?
  • धाड.. धाड कोसळणार सोन्याचे दर, सरकार थेट निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट अर्ध्यावरच..
  • जगातील ‘ओम’ आकाराचं सर्वात पहिलं मंदिर… आध्यात्म, भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in