• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ज्याची भीती तेच घडले, थेट दणका, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ, तब्बल..

May 23, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारतात बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली. दहा दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालीये. मोठा दणका सर्वसामान्यांना बसल्याचे दिसतंय. पहिल्यांदाच थेट 3 रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा वाढ झाली. आज 23 मे 2026 रोजी सरकारने दहा दिवसांमध्ये तिसऱ्यांदात मोठी वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये केली. देशात इंधनाचा तुटवडा आहे. इंधनाच्या तुटवड्यासोबतच आता सतत पेट्रोल आणि डिझेलच्या कितमीमध्ये वाढ होत आहे. केंद्र सरकारकडून या काळात मार्ग काढण्याकरिता एका मागून एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. सोने न खरेदी करण्याचे आवाहन अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आला. आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पेट्रोलच्या किमतीमध्ये 87 पैशांची वाढ तर डिझेलच्या किमतीमध्ये 91 रूपयांची वाढ करण्यात आली. सरकारने इराण आणि अमेरिका युद्धात कोणत्याही प्रकारची इंधनात भाव वाढ होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांपासू आता तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. या युद्धात महागाईचा मोठा फटका बसत आहे.

महागाई सतत वाढताना दिसत आहे. अनेक गोष्टींच्या भावात वाढ झाली. त्यामध्येच राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई बघायला मिळतंय. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे टंचाई असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमाकांचा देश आहे जो मोठ्या प्रमाणात ऊर्जा आयात करतो. दिवसेंदिवस भारतात ऊर्जेची मागणी वाढत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ होत आहे. जोपर्यंत इराण आणि अमेरिका युद्ध थांबणार नाही, तोपर्यंत हे भाव वाढतच जाणार. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. देशभरात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये भाव वाढ करण्यात आली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाजा सोडलेल्या पोरी… मराठी अभिनेत्रीने बोल्ड शूट करताच नेटकरी संतापले
  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in