• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘ज्यांचे बूट चाटायला गेलात, त्यांनी…’ यवतमाळच्या सभेत संजय राऊतांचा संजय देशमुखांवर हल्लाबोल

June 27, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांचाही समावेश आहे. आजपासून उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात मेळावे आणि सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाची यवतमाळमध्ये सभा पार पडली. यात खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

बाजारात कुणी 500 रुपयांना घेतलं नसतं…

खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आम्ही शिवसेनेसोबत राहतो म्हणून उपकार करत नाही. बाळासाहेबांनी खूप दिलं. निष्ठावंत शिवसैनिक आहेत म्हणून ही शिवसेना वादळात, संकटात उभी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सभा सुरू आहे. इथे शेतकऱ्यांचा माल येतो. विकला जातो. त्याला फार भाव मिळत नाही. 15 दिवसापूर्वी एक माल आला आणि 50 कोटीला विकला गेला. 50 कोटी भाव झाला त्याचा. या बाजारात त्याला कोणी 500 रुपयात घेतलं नसतं. तो शिवसेनेत आला. त्याला उद्धव ठाकरेंनी खासदार केला. म्हणून त्याची किंमत 50 कोटी झाली. उद्याच्या निवडणुकीत त्याची पाच रुपयेही किंमत ठेवू नका.

ज्या मोदींचे बूट चाटायला गेलात त्यांनी…

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले कूी, ‘मला आश्चर्य वाटतं, विकास निधीसाठी गेले. माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. अरे कसला विकास करणार तुम्ही. 12 वर्षात मोदी देशाचा विकास करू शकले नाही. त्या मोदींच्या वाराणासीत जा, रस्ते नाही, पाणी नाही, पूल नाही, ज्या मोदींचे बुट चाटायला गेला, ते विकास करू शकले नाही, तुम्ही काय विकास करणार. कुणाकडे गेले तर ज्यांनी राम मंदिराच्या पेटीतून 2 हजार कोटी मोदींच्या लोकांनी चोरले. त्या मोदींचे बुट चाटायला गेले.

शिवसेनेचा झेंडा यवतमाळवर कायम राहील – राऊत

संजय राऊत यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘काल उद्धव ठाकरेंचं नागपूरला आगमन झालं. प्रचंड गर्दी झाली. एकनाथ शिंदे आणि गद्दारांनी पाहिलं असेल तर कळलं असतं शिवसेना जागेवर आहे. जागेवर राहिल. तुमच्या छाताडावर पाय ठेवून लोकसभा आणि विधानसभेला जाईल. यवतमाळ हा कायम बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा जिल्हा आहे. शिवसेनेचा भगवा झेंडा यवतमाळवर कायम राहिला आणि कायम राहील.’

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in