• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो – CM फडणवीस

May 23, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगरमध्ये निबे समूहाच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्योगपती गणेश निंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गणेश निंबे यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. “गणेश निंबे यांच्याकडे आत्मविश्वास असल्यामुळेच हा मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. त्यांनी तयार केलेली संरक्षण उत्पादने देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत,” असे ते म्हणाले.

या कॉम्प्लेक्समध्ये तयार होणारे शेल्स आणि इतर संरक्षण साहित्य देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्षभर उत्पादन सुरू राहील, अशी तयारी कंपनीने केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भविष्यात सी प्लेन तयार करण्याची तयारीही निबे समूहाने सुरू केल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“ऑपरेशन सिंदूरमधून भारताची ताकद जगाने पाहिली. जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. अहिल्यानगर आता डिफेन्स क्लस्टरचे मोठे केंद्र बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या
  • मुंबई पालिका आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारली, वंचितचा आरोप; माफीची मागणी!
  • तुमच्या हृदयासाठी कोणते तेल चांगले?, या 5 तेलांचा वापर ठरेल फायदेशीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in