• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जो गद्दारी करेल तो… मनोज जरांगे आटपाडीत कडाडले, मराठा आरक्षणावर मोठं विधान

August 9, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौर सुरू आहे. सांगली जिल्ह्यात त्यांचा दोन दिवसांचा दौरा असून आज जरांगे-पाटील यांनी आटपाडीमध्ये सभा घेतली. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सभेच्या ठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच व्यासपीठकडे जाताना पुष्पवृष्टी करण्यात आली. आजच्या सभेत बोलताना गद्दारी करणाऱ्या मराठा बांधवांवर भाष्य केले आहे. जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

समाजावर अन्याय झाला की तुटून पडायचं…

मनोज जरांगे पाटील यांनी आटपाडीतील सभेत बोलताना म्हटले की, ‘एका गोष्टीचा आनंद होत आहे, राजकारणात भावकीत विखुरलेला मराठा समाज आज एकत्र आला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा एकच होत नाही. पण आटपाडी मध्ये येऊन बघा. अभिमान वाटतो मला माझ्या जातीचा. जन्म घ्यावा तर मराठा जातीत. गर्व व्हायला लागला आहे मला मराठा समाजात जन्म झाल्याचा. मला गाठीभेटी घायच्या आहेत. पण तुम्ही सभा घेत आहात. समाजावर अन्याय झाला की तुटून पडायचं. आपल्या लय पिढ्या पक्षाला बाप मानण्यात गेल्या. समाजाला आता हे कळत आहे.’

जो गद्दारी करेल तो…

पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘सगळ्या विषयावर तुळसी पत्र ठेवले आहे. फक्त एकच ध्यास मराठा समाजला आरक्षण. गेले तीन वर्षे समाजाला माय बाप मानून काम करत आहे. मी गद्दारी केली नाही. जो करेल तो मराठा जातीचा नाही. त्याच्यात रक्त मराठा समाजाचे नाही. या सरकारने अचानक नोंदी बंद केल्या. त्यांच्या दरबारात कट शिजला गेला. तीन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी कट रचले, पण त्यांचे काही चालले नाही. शेवटचं जाता जाता कट रचला. कुणबी नोंदी दिल्या आणि रद्द करायचं ठरवलं.’

ईडी आली की…

आपल्या भाषणात जरांगेंनी पुढे म्हटले की, ‘मराठ्यांना आता ही वेडे समजलं जातं. त्याच्या अन्नात विष काळवायच काम केलं. 58 लाख नोंदी सापडल्या. शिंदे समिती कामाला लागली आणि 58 लाख नोंदी सापडल्या. हे आरक्षण पक्कं होतं आहे. ओबीसीचे आम्हाला द्या असं आम्ही म्हणत नाही. पण 58 लाख नोंदी आरक्षणमध्ये जात आहेत. सरकारने काय कट रचला. त्यांच्या डोक्यात की कुणबी प्रमाणपत्र आणि नोंदी टिकत नाही. टीव्ही वर चालू. शांत कट रचला. पण नियती चांगली आहे. बावनकुळे लय निराळं. सगळी कुळे ऐकली पण या 52 कुळेच नाही आणि 96 कोळी च्या नादी लागलंय. यांच्याकडे ईडी आहे, पण ईडी आली की त्याला घोडा लावायचा. सगळेच पक्ष बदलत आहेत. आम्ही लय येडे आहोत, आमच्या नादी नाही लागायचं.’

फडणवीस तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही…

जरांगे पाटलांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘एकनाथ शिंदे साहेब शिरसाट यांच्या हातून वाईट करतील, हे समाजाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. माझ्या गरीबाच्या आडवा आला तर त्याला मोजणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मी दुखावलं नाही. मला राजकारण करायची गरज नाही पण त्यांनी हा डाव रचला. फडणवीस तुम्हाला जिंदगीमध्ये यशस्वी होऊ देणार नाही. चूक केली तर सोडणार नाही. बावनकुळेंवर मराठ्यांचा नेता एकही बोलत नाही. खरच त्यांचे मराठ्यांचा रक्त नाही. बावनकुळे मराठ्यांच्या विरोधात काम करतोय. एक ही मराठा नेता बोलत नाही, मात्र मताच्या वेळी आपल्याकडे येतात.’



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पोस्ट ऑफिसमधील PPF, SSY आणि SCSS खाती बँकेत ट्रान्सफर करता येतात का? जाणून घ्या पोस्टाचा अधिकृत नियम
  • ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?
  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in