• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जेनिफर विंगेटचं वयाच्या 41 व्या वर्षी दुसरं लग्न; कोण आहे पती विलियम इश्माइल?

July 19, 2026 by admin Leave a Comment


‘दिल मिल गए’, ‘बेपनाह’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. घटस्फोटाच्या 12 वर्षांनंतर तिने बिझनेसमन विलियम इश्माइलशी दुसरं लग्न केलं आहे. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. सोशल मीडियावर सध्या जेनिफरच्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जेनिफरने 18 जुलै रोजी इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये जेनिफर आणि विलियम हे हातात हात धरून चर्चबाहेर निघताना दिसत आहेत.

जेनिफरने ख्रिश्चन पद्धतीनुसार चर्चमध्ये लग्न केलं. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा स्ट्रॅपलेस ब्राइडल गाऊन परिधान केला होता. तर विलियमने क्लासिक नेव्ही ब्ल्यू रंगाचा सूट आणि त्यावर क्रीम रंगाचा वेस्टकोट घातला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विलियम इश्माइल हा सिंगापूरचा एक बिझनेसमन आहे. गेल्या काही काळापासून तो जेनिफरला डेट करत होता. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

विलियमने युकेमध्ये इकोनॉमिक्स आणि फायनान्सचं शिक्षण घेतलं आहे. ग्लोबल फायनान्समध्ये करिअरची सुरुवात करण्यापूर्वी त्याने 2002 आणि 2005 दरम्यान बॅचलरची पदवी संपादित केली. तो सध्या एमएचसी डिजिटल ग्रुपमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि ट्रेडिंगचा संचालक म्हणून काम करत आहे. ही कंपनी डिजिटल एसेट्स आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रात काम करते. ऑक्टोबर 2022 मध्ये तो या कंपनीशी जोडला गेला होता.

विलियम लाइमलाइटपासून दूरच राहणं पसंत करतो. त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट आहे आणि त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर फारच कमी माहिती आहे. एमएचसी डिजिटल ग्रुपमध्ये काम करण्याआधी विलियमने फायनान्शिअल सेक्टरमध्ये काम केलं होतं. त्याने सीबीएस इन्वेस्टमेंट बँकमध्ये जवळपास दहा वर्षे काम केल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे जेनिफर विंगेटबद्दल बोलायचं झाल्यास तिचं हे दुसरं लग्न आहे. तिने याआधी अभिनेता करण सिंह ग्रोवरशी लग्न केलं होतं. ‘दिल मिल गए’ या लोकप्रिय मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं.

जेनिफर आणि करणने 2012 मध्ये लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं लग्न फक्त दोन वर्षेच टिकलं. 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर 2016 मध्ये करणने अभिनेत्री बिपाशा बासूशी दुसरं लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
  • Dev Chaudhary: बॅट धरता येईना, कॅचही घेता येईना, ऑक्शनमध्ये नावंही नाही अन् थेट DPL मध्ये खेळला, विराट कोहलीच्या कोचशी थेट संबंध
  • Nepal Floods : नेपाळला जसं अंधारात ठेवलं तसं चीनने..बॉर्डरजवळ चीन बांधत असलेलं विशालकाय धरण भारतासाठी वॉटर बॉम्ब ठरणार का?
  • ‘एक खोका, मतदाराला धोका’ ठाकरे सेनेच्या नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश करताच मतदार संतापले, केली मोठी मागणी
  • सर्वसामान्यांना झटका, एका अंड्याची विक्री 20-25 रुपयांना होणार? बाजारात नेमकं काय बिघडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in