• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरतोय, पण…! बीसीसीआयचा प्लान नेमका आहे तरी काय?

August 31, 2026 by admin Leave a Comment


भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली होती. पण शेवटच्या क्षणी मालिकेतून माघार घ्यावी लागली. दुखापतीतून सावरला नसल्याने बीसीसीआयने प्रशासनाने जोखिम घेणं टाळलं. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतही त्याचं खेळणं कठीण आहे. असं असताना टीम इंडियात कधी पदार्पण करेल हा प्रश्न क्रीडाप्रेमींना आणि खासकरून जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांना सतावत आहे. काही जणांच्या मते या वर्षीच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पदार्पण करेल अशी शक्यता आहे. पण बीसीसीआय त्याच्याबाबत फार काही जोखिम घेऊ इच्छित नाही. कारण पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने फिट अँड फाईन राहणं आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनासाठी खास प्लान आखला आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यातून त्याला बुस्टर दिलं जाईल.

बीसीसीआय सूत्रांची माहिती तरी काय?

सप्टेंबर महिन्यात एशियन गेम्स स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराह फिट अँड फाईन होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बुमराह दुखापतीवर मात करून सावरत आहे. त्याने 2027 वनडे वर्ल्डकप आणि कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची योजना होती. पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला प्रथम टी20 क्रिकेटमधून पुनरामन करण्यावर विचार केला जात आहे. त्याच्या दुखीपतीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. अफगाणिस्तानविरुद्धची टी20 मालिका जवळ आली आहे. पण शेवटच्या क्षणी काही अनपेक्षित घडामोडी घडल्यास एशियन्स गेम्स स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.’

दुसरीकडे, अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी फिट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तसेच वॉशिंग्टन सुंदरलाही ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्याता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी नितीश कुमार रेड्डी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये कसून सराव करत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अजून संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे या संघात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर हे तिन्ही खेळाडू शर्यतीत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amit Thackeray | ‘माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल’ अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
  • एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
  • हृता दुर्गुळेचा नवीन लुक चर्चेत, दोन वेण्या अन् मोठे कान, लवकरच या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
  • ज्या लोकांना लक्ष वेधून घेण्याची गरज…, फोटो पोस्ट करत असं काय बोलून गेली काजोल?
  • टेन्शन… टेन्शन… टेन्शन… भारतालाही नेपाळ सारखा जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in