• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जर तुमच्या जमिनीवर विमानतळ होणार असेल तर तुम्हाला सरकारकडून किती पैसे मिळतात? ऐकून बसेल धक्का

June 18, 2026 by admin Leave a Comment


नोएडा येथील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता व्यावसायिक विमान उड्डाणांना सुरुवात झाली आहे. विमानांचं उड्डाण सुरू होताच शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण आणि त्या जमिनीचा मोबदला यावर चर्चा सुरू झाली आहे. परंतु त्यानंतर अनेकांना आता असा प्रश्न पडला आहे की, समजा एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी जर तुमची जमीन अधिग्रहित करण्यात आली तर तुम्हाला त्याचा नेमका किती मोबदला मिळतो? समजा तुमची जमीन जर सरकारने एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अधिग्रहित केली तर त्याबदल्यात तुम्हाला किती मोबदाला मिळू शकतो? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

मोबदल्याचं नेमकं गणित काय?

सरकार जेव्हा पण एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी तुमच्या जमिनीची निवड करते तेव्हा आधी त्या जमिनीचं अधिग्रहण केलं जातं. त्यानंतर तुम्हाला त्या जमिनीचा किती मोबदला मिळणार हे ठरवलं जातं. तुमच्या जमिनीचा तुम्हाला किती मोबदला मिळणार हे पूर्णपणे त्या भागातील जमिनीचं बाजार मूल्य आणि तुमच्या जमिनीचं लोकेशन काय आहे? यावर अवलंबू असतो. प्रत्येक राज्यासाठी जमिनीचा भाव हा वेगवेगळा असतो. तरी देखील जमिनिचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना सरासरी 1 ते 1.50 कोटीपर्यंत रक्कम दिली जाते. जर तुम्ही हेक्टरचा विचार करत असाल तर तिथे तुमच्या जमिनीचं बाजार मूल्य किती आहे, तसेच तुमच्या जमिनीचं लोकेशन काय आहे? यावरून त्याची किंमत ठरते.

साधारणपणे एक हेक्टरसाठी सरकार सरासरी 20 लाख ते 60 लाख रुपयांपर्यंत अधिग्रहित जमिनीचा मोबदला देते. हे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत. जर तुमची जमीन ही प्राईम लोकेशनला आणि शहराला लागून असेल तर तुम्हाला त्या जमिनिचा मोबदला देखील जास्त मिळतो. जर तुमची जमीन हे प्राईम लोकेशनला नसेल आणि तेथे बाजार भाव देखील कमी असेल तर अशावेळी तुम्हाला तुमच्या जमिनीचे कमी पैसे मिळतात. तुमच्या परिसरात जमिनीचा सरासरी जो भाव सुरू आहे, त्यापेक्षा थोडा अधिकचा मोबदला सरकारकडून तुमची जमिन अधिग्रहन करताना दिला जातो.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in