• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर…गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!

August 9, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, राज्यातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. “दुसऱ्या झोडो पत्रकार परिषदेमुळे जरांगे पाटलांना मिरची लागली, मनोज जरांगे पाटलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. ओबीसी, भटक्या जमाती, तेली समाजाचा ते असा अपमान करू शकत नाहीत. माज कोणाला आलाय, माज कोणाला चढला आहे, हे महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे.”

पुढे ते म्हणाले, “क्रेनवर उभा राहून, बोलतातना, त्यामुळे ते बघून लोक सांगतील कोणाला माज आला आहे ते?” तसेच त्यांनी एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना सवाल केला. “जरांगे हवेवर नाचतात, ती हवा, तो हवेचा प्रेशर उपमुख्यमंत्री यांनी बंद केला पाहिजे, त्यामुळे ते उड्या मारणार नाहीत,” असे सदावर्ते म्हणाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!
  • Tapsee pannu : तुम्हाला फार मजा येत्ये का ? कंगनाचं नाव काढताच भडकली तापसी पन्नू, फटकारत म्हणाली..
  • मराठी सक्तीचा वाद चिघळला, रिक्षा-टॅक्सी चालकाची थेट हायकोर्टात धाव, याचिकेत आरोप काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in