• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जयपूरमध्ये हल्ला झाल्यानंतर, अभिजीत दिपके यांची प्रतिक्रिया, म्हणाले की प्रेमाने ही…

June 15, 2026 by admin Leave a Comment


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्य कांत यांच्या एका टिप्पणीवरुन उपाहासातून  तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना जयपूर येथे आज मारहाण झाली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जयपूर येथील शहीद स्मारकात कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी अभिजीत दिपके यांना खांद्यावर घेतले. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणा देत जवळ जाऊन त्यांच्या कानाखाली मारली. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना दिपके यांनी शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

जयपूरात शहीद स्मारकात आंदोलन करत असताना कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे देखील व्हिडीओत दिसत आहे. अभिजीत दिपके यांनी परदेशातून ( अमेरिका ) भारतात येऊन नीट परीक्षा फुटी प्रकरणात आंदोलन सुरु केले आहे. आधी दिल्लीतील जंतरमंतर येथे पहिले आंदोलन झाले. त्यानंतर काल पुणे येथे नीट परीक्षा फुटी प्रकरणात आंदोलन झाले. या आंदोलनानंतर जयपूरात विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

आज जयपूरातील शहीद स्मारक येथे अभिजीत दिपके यांचे आंदोलन सुरु असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलले. त्यानंतर गर्दी काही जण आले आणि अभिजीत दिपके यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर उपस्थित जमावाने काही कार्यकर्त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त असूनही अभिजीत दिपके यांना मारहाण कशी झाली असा सवाल केला जात आहे.

येथे पोस्ट वाचा…

Don’t get distracted.

Dharmendra Pradhan Resign! pic.twitter.com/Dxtf3tBNin

— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) June 15, 2026

अभिजीत दिपके यांची प्रतिक्रीया…

राजस्थानच्या जयपुरमध्ये अभिजीत दिपके यांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी X वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये अभिजीत दिपके यांनी म्हटलेय की
मी गांधी आणि आंबेडकरांचा अनुयायी असून शांतता आणि प्रेमाने ही लढाई लढत राहीन. शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण असल्याचेही त्यांना या पोस्टमध्ये म्हटले आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो, भुसे म्हणाले, असं केलं असेल तर… पुन्हा वाद पेटणार?
  • EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा इशारा; 58 व्या वर्षी PF चे पैसे न काढल्यास होणार मोठे आर्थिक नुकसान
  • Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन का साजरे केले जाते? जाणून घ्या सनातन धर्मातील रक्षासूत्राचे महत्त्व आणि पौराणिक कथा
  • अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुती फ्रॉन्क्स! 5 सर्वात स्वस्त व्हेरिएंट्सचे लोन, डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स एकाच ठिकाणी
  • ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in