• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जमिनीवर पडलेले संजीव कपूर, सीपीआर दिलं पण…, शेवटच्या क्षणी अशी होती अभिनेत्याची अवस्था, सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा

July 31, 2026 by admin Leave a Comment


झगमगत्या विश्वात अशा काही घटना घडतात, ज्या खरंच वेदनादायी असतात. ज्या सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तेच सेलिब्रिटी चाहत्यांना रडवून गेले. अभिनेते संजीव कुमार यांनी देखील फार कमी वयात अखेरचा श्वास घेतला. पण मृत्यूपूर्वी संजीव यांच्या घरातील वातावरण कसं होतं याबद्दल अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मोठा खुलासा केला आहे. पिळगांवकर यांनी सांगितल्यानुसार, संजीव कुमार यांनी सचिन यांना भेटण्यासाठी सकाळी घरी बोलावलं होतं. पण काम असल्यामुळे पिळगांवकर दुपारी पोहोचले. पण तोपर्यंत उशीर झालेला. संजीव कुमार यांनी अखेरचा श्वास घेतलेला. पण तेव्हा नेमकं काय झालं, याबद्दल सचिन यांनी मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत सचिन म्हणालेले, संजीव कुमार यांनी सचिन यांना सकाळी भेटालयला बोलावलं होतं, पण काही काम असल्यामुळे सचिन दुपारी 2.30 वाजता संजीव यांच्या घरी पोहोचले. पण तोपर्यंत उशीर झालेला. संजीव यांची प्रकृती खालावलेली आणि त्याचं निधन झालं आहे, हे देखील कोणाला माहिती नव्हतं… तेव्हा नेमकं काय घडलेलं, यावर सचिन यांनी मोठा खुलासा केलेला…

सचिन मुलाखतीत म्हणालेले, ‘मी दुपारी त्यांच्या (संजीव कपूर) घरी पोहोचलो… तेव्हा मला सांगण्यात आलं, ते त्यांच्या खोलीत आहे आणि अंघोळ करत आहेत. मी जवळपास अर्धा तास त्यांची वाट पाहिली… पण ते आलेच नाहीत. त्यानंतर मी घरातील स्टाफला विचारलं, ‘त्यांची तब्येत ठिक नाही का?’ यावर ते म्हणाले नाही… त्यांचे पीए डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेले आहेत. थोड्या वेळात जमनादास आणि डॉ.गांधी त्यांच्या घरी आले. मी विचारलं काय झालं आहे. यावर डॉक्टरांनी सांगितलं, रात्री त्यांना उलटी झालेली आणि रात्री 3 – 4 वाजेपर्यंत ते कामच करत होतं…’

‘तेव्हा मला प्रचंड राग आला. तब्येत ठिक नाही तरी एवढ्या रात्री काम करण्याची काय गरज होती.. मला काहीतरी गडबड आहे.. असं कळू लागलेलं आणि अंघोळीला एवढा वेळ का लागतो? असा प्रश्न देखील मला सतावत होता. पण मी त्यांच्या खोलीत जाण्याचा निर्णय घेतला. मला वाटलं काय असेल, ते कपडे बदलत असतील, तर माफी मागेल आणि खोलीचा दरवाजा ओढून घेईल…’

‘मी बेडरुमचा दरवाजा खोलला आणि समोरचं दृश्य फार भयानक होतं. सुरुवातीला मला खोलीत काहीच दिसलं नाही. त्यानंतर मला कारपेटवर दोन पाय दिसले… मी पुढे गेलो आणि पाहिलं तर संजीव कपूर जमीनीवर पडलेले होते. मी डॉक्टरांना बोलावलं. पण तोपर्यंत उशीर झालेला. डॉक्टरांनी संजीव यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, सीपीआर देखील देण्यात आलं. पण डॉक्टरांनी सांगितलं, त्यांचं निधन फार आधी झालं आहे…’, सांगायचं झालं तर, संजिव कपूर यांचं निधन 6 नोव्हेंबर 1985 मध्या हृदयविकाराच्या झटक्याने झालं… वयाच्या 47 वर्षी संजीव कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर
  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in