• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगासाठी मोठी गुड न्यूज, मध्यपूर्वेतील युद्ध अखेर थांबलं; इराणची युद्धातून माघार, शस्त्र खाली ठेवत सर्वात मोठी घोषणा

June 8, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये यावर्षी 16 एप्रिलला युद्धविराम झाला होता. मात्र त्यानंतर रविवारी इस्त्रायलने युद्धविराम सुरू असताना देखील लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिणी उपनगरांवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यामुळे हा युद्धविराम तुटला. दरम्यान इस्त्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे इराण अधिक आक्रमक बनले, इराणकडून इस्त्रयालवर मिसाईल हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये इस्त्रायलच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर वीस जण गंभीर जखमी झाले. दरम्यान त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलकडून देखील इराणवर हल्ला करण्यात आला. इराणच्या महशहरमध्ये असलेल्या पेट्रोकेमिकल परिसरात इस्त्रायलने मिसाईल हल्ला केला, तसेच इराणच्या अनेक सैन्य ठिकाणांवर देखील हल्ला करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली. मध्य पूर्वेत तणाव वाढला.

मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इराणने या युद्धातून माघार घेतली आहे. इराणकडून इस्त्रायलविरोधात सुरू असलेली सैन्य कारवाई तातडीने थांबवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं, त्यानंतर युद्धविराम झाला. दरम्यान आता या युद्धविरामाला अनेक दिवस होऊन गेले आहेत, त्यानंतर पहिल्यांदाच इराणने सोमवारी इस्त्रायलवर भीषण हल्ला केला, त्यानंतर इस्त्रायलने देखील इराणवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. मात्र आता इराणने सैन्य कारवाई थांबवण्याची घोषणा केली आहे. युद्ध आता थांबलं आहे.

दरम्यान इराणने जरी युद्ध थांबवलं असलं तरी देखील त्यांनी इस्त्रायलला धमकी दिली आहे, तुम्ही जर पुन्हा लेबनॉनवर हल्ला केला तर आम्ही तुमच्यावर भीषण असे मिसाईल हल्ले करू असं इराणने म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा इस्त्रायल लेबनॉनवर हल्ले करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे, आणि जर इराणच्या इशाऱ्यानंतर देखील इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ला केला तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. इराणकडून इस्त्रायलला थेट धमकी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इस्त्रायलला समज दिली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी कुली म्हणून १० रुपये कमवायचा, इडली-डोसा बॅटरद्वारे उभा केला ६८१ कोटींचा बिझनस
  • Special Report : साखर कडू का झाली? इथेनॉलचा संबंध किती? सहा कारणांपैकी दोन कारणं धक्कादायक
  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in