• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगावर मोठं संकट! ज्याची भीती होती तोच निर्णय अमेरिकेकडून, थेट काढले पत्रच..

August 9, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळाला. आता अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवले आहेत. मात्र, यादरम्यानच मोठी माहिती पुढे येत आहे, ज्यामुळे सर्व जगानेच धसका घेतला. अमेरिकेने आपल्या शस्त्र उत्पादनात मोठी वाढ केली. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात 5 महिने मोठे क्षेपणास्त्र अमेरिकेने इराणवर टाकली. आता त्यांनी आपले शस्त्र उत्पादन वाढवले आहे. अमोरिकेने अचानक शस्त्र उत्पादन वाढवल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अमेरिकेचा काहीतरी मोठे करण्याचा डाव असल्याचे बोलले जाते. पेंटागनचे प्रवक्ते सीन पार्सेन यांनी शस्त्रे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यावेळी धोका निर्माण होईल, त्यावेळी शस्त्र कमी नसून नयेत, याकरिता त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कळतंय.

उपसंरक्षणमंत्री स्टीव फीनबर्ग यांनी नुकताच संरक्षण कंपन्यांना पत्र पाठवले आहे. 21 दिवसांमध्ये आपली योजना पाठवण्याबद्दल त्या पत्रात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्पादन वाढले पाहिजे, असे त्या पत्रात म्हटले आहे. इराणच्या पाच महिन्याच्या युद्धात अमेरिकेचा शस्त्रसाठा कमी झाल्याने शस्त्र उत्पादन अमेरिकेने वाढवल्याच बोलले जातंय.

अमेरिकेच्या सैन्यातील मिसाईल कमी झाल्याचे सांगितले जातंय. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली. मोठे हल्ले इराणवर करण्यात आली. होर्मुज खाडीत अमेरिकेचे सैन्य काही दिवस होते. यादरम्यान इराणच्या दिशेने जाणाऱ्या जहाजांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला. इतके मोठे हल्ले होत असतानाही इराण मागे हटताना दिसले नाही.

इराणवर प्रचंड मोठी हल्ले अमेरिकेने केली. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली होती. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठे संकट कच्च्या तेलाचे भारतासह अन्य देशांमध्ये होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढताना दिसल्या. त्यातच अमेरिकेने शस्त्र उत्पादन वाढवण्यावर भर दिला. अमेरिकेकडून भारत आणि चीन यांच्यासह अन्य तीन देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची तयारी करण्यात आली. हा भारतासाठी मोठा धक्का आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पोस्ट ऑफिसमधील PPF, SSY आणि SCSS खाती बँकेत ट्रान्सफर करता येतात का? जाणून घ्या पोस्टाचा अधिकृत नियम
  • ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?
  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in