• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगात हाहाकार! इराणकडून मोठी घोषणा, भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, जग संकटात..

July 12, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष वाढला आहे. खामेनेई यांच्यावरील अंतिम संस्कारनंतर इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. इराणी मीडियाने केलेल्या दाव्यानुसार, शनिवारी रात्री उशिरापर्यंत आणि रविवारी सकाळपर्यंत अनेक शहरांमध्ये बॉम्बचे आवाज ऐकू आले. त्यानंतर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स यांच्याकडून होर्मुज खाडी बंद करण्याची घोषणा करण्यात आली. पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद करण्यात आली. एकीकडून अमेरिकेकडून आरोप करण्यात आला की, इराणने साइप्रसचा झेंडा असलेल्या जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जहाजावरील कर्मचारीही बेपत्ता आहेत. होर्मुज खाडी पार करताना हा हल्ला करण्यात आला. यूएस आर्मीने माहिती देत म्हटले की, IRGC ने साइप्रसचा झेंडा लावलेल्या वासले जहाजावर M\VGFS गॅलेक्सी जहाजावर हल्ला केला.

होर्मुज खाडी पार करताना हा हल्ला झाला. जहाजावर सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत. होर्मुज खाडी पार करत असलेल्या जहाजावर इराणकडून हल्ला करण्यात आल्याने अमेरिकेने इराणच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले केले. रात्रीपासून ते सकाळपर्यंत हे हल्ले सुरू होते. यादरम्यमानच आता इराणकडूनही मोठा इशारा देण्यात आला. इराणने म्हटले की, आमच्याविरोधात जर कोणतीही मोठी कारवाई करण्यात आली तर आम्हीही त्याला तसेच उत्तर देऊ.

इराणने या तणावात पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद करण्याची घोषणा केली. ज्याने तणाव प्रचंड वाढला आहे. IRGC ने म्हटले की, जर शत्रू परिस्थितीचा फायदा घेत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले जाईल. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट 1000 मिसाईलने इराणवर हल्ला करण्याची धमकीही दिली. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव हा प्रचंड वाढला आहे.

त्यामध्येच इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्याची घोषणा करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झाला. होर्मुज खाडी सुरू झाल्याने अनेक देशांनी सुटकेचा निश्वास घेतला. आता पुन्हा एकदा तणाव वाढला आणि थेट होर्मुज खाडी बंद केल्याची घोषणा करण्यात आली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in