
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा सध्या अयशस्वी होताना दिसत आहे. एकीकडे अमेरिकी सैन्याने अब्बास बंदरात असलेल्या इराणच्या एका ग्राऊंड स्टेशनवर सुद्धा हल्ला केल्याने खळबळ माजली. मात्र यामुळे इराण खवळला. अब्बास बंदराजवळील हल्ल्यांना इराणने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेच्या हवाई तळाला लक्ष्य करून हल्ला केल्याचा दावा इराणच्या आयआरजीसीने केला आहे. त्याचवेळी, कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून देशाच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखत असल्याचे म्हटले .
तसनीम वृत्तसंस्थेनुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने गुरुवारी सांगितलं की, स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:50 वाजता अब्बास बंदराजवळ अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी एका अमेरिकन हवाई तळाला लक्ष्य केलंय. मात्र आयआरजीसीने नेमका कोणता अमेरिकन तळ लक्ष्य केला, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply