• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चेन्नई विमानतळावर इंडिगो फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग, इंजिनमध्ये बिघाड

August 12, 2026 by admin Leave a Comment


अगदी कमी वेळात लांबचा प्रवास करण्यासाठी अनेकजण विमानाने जाणे पसंत करतात. पण गेल्या काही दिवसांपासून देशात वेगवेगळ्या ठिकाणी सतत विमान प्रवासादरम्यान वेगवेगळ्या घटना घडत असल्याचे दिसत आहे. कुठे अचानक विमानामध्ये बिघड झाला तर कुठे लँडिगच्या वेळी काही तरी गोंधळ झाला. आजकाल विमान दुर्घटनांमुळे प्रवासी विमानाने प्रवास करावी की नाही याचा दहा वेळा विचार करत आहेत. आता कोलकाताहून चेन्नईकडे जाणाऱ्या विमानात बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

कोलकाताहून चेन्नईकडे येणारी इंडिगोची फ्लाइट 6E-723 च्या डाव्या इंजिनमध्ये लँडिंगच्या अगदी आधी बिघाड झाला. विमानात २२४ प्रवासी बसले होते. सूत्रांच्या मते, पायलटच्या सूचनेनंतर चेन्नई विमानतळावर काल रात्री ११:२९ वाजता पूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली. विमानाने ११:३७ वाजता रनवे २५ वर सुरक्षित लँडिंग केले. सर्व २२४ प्रवासी आणि क्रू सुरक्षित आहेत. आपत्कालीन सूचना मिळताच विमानतळावर आवश्यक सुरक्षा व्यवस्था सुरू करण्यात आल्या. फ्लाइटच्या सुरक्षित लँडिंगसाठी अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. फ्लाइट चेन्नईला पोहोचण्याची निर्धारित वेळ रात्री ११:३० होती, तर तिच्या ११:३७ वाजता पोहोचण्याचा अंदाज होता.

लँडिंगनंतर विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. फ्लाइट सुरक्षित उतरल्यानंतर चेन्नई विमानतळावर जाहीर केलेली आपत्कालीन स्थिती रात्री ११:४७ वाजता अधिकृतरीत्या उठवण्यात आली. चेन्नई विमानतळ प्राधिकरणाच्या मते, घटनेनंतर विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स सामान्यपणे सुरू आहेत.

इंडिगोच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक समस्या

इंडिगोच्या उड्डाणांमध्ये तांत्रिक समस्येचा हा पहिला प्रकरण नाही. यापूर्वीही वेगवेगळ्या उड्डाणांमध्ये इंजिन बिघाड आणि तांत्रिक अडचणींनंतर विमाने सुरक्षित उतरवण्यात आली आहेत. मार्च २०२६ मध्ये विशाखापट्टणमहून दिल्लीकडे येणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट ६ई-५७९ मध्ये इंजिनमध्ये बिघाडाची शक्यता समोर आली होती. त्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली होती. विमानाला सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुरक्षित उतरवण्यात आले होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोहन भागवतांच्या अमेरिकेतील कार्यक्रमावरून वाद, 61 संघटनांचा विरोध, नेमकं कारण काय?
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
  • राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण…
  • Sania Mirza : थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; शूटिंग सोडून पायजमा-चप्पलमध्ये धावली खास मैत्रीण !
  • धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in